सचिन पिळगांवकरांनी लाडक्या मित्राला भरवला केक, अशोक सराफ यांच्या वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 11:17 IST2025-06-06T11:17:17+5:302025-06-06T11:17:49+5:30

Ashok Saraf Birthday Celebration: अशोक सराफ यांच्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. सचिन पिळगावकरांनी हे फोटो शेअर केले आहेत

marathi actor ashok saraf birthday celebration with sachin pilgaonkar and supriya pilgaonkar | सचिन पिळगांवकरांनी लाडक्या मित्राला भरवला केक, अशोक सराफ यांच्या वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन, फोटो व्हायरल

सचिन पिळगांवकरांनी लाडक्या मित्राला भरवला केक, अशोक सराफ यांच्या वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन, फोटो व्हायरल

अशोक सराफ (ashok saraf) हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते. अशोक सराफ यांना आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. अशोक सराफ यांचा काही दिवसांपूर्वी पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला. अशोक सराफ यांचं कुटुंब आणि त्यांच्या चाहत्यांना यामुळे चांगलाच आनंद झाला. पद्मश्री मिळाल्यावर अशोक सराफ यांच्या वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी अशोक सराफ यांचे इंडस्ट्रीतील मित्र आणि त्यांचे कुटुंबीय पाहायला मिळाले. 

अशोकमामांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन

सचिन पिळगांवकरांनी सोशल मीडियावर अशोक सराफ यांच्या वाढदिवस सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये सचिन पिळगांवकर लाडक्या मित्राला केक भरवताना दिसत आहेत. तर सचिन यांची पत्नी सुप्रिया पिळगांवकर अशोकमामांचं औक्षण करताना दिसत आहेत. याशिवाय या फोटोत निवेदिता सराफ यांची बहीण पाहायला मिळत आहे. अशाप्रकारे अशोक सराफ यांच्या वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन करण्यात आहे. 

अशोक मामांच्या वाढदिवशी आणखी एक आनंदाचा क्षण दिसून येतो. तो म्हणजे अशोकमामांचा नुकताच पद्मश्री पुरस्काराने सन्मान  करण्यात आला. यामुळे अशोकमामांच्या वाढदिवसाचं यंदा डबल सेलिब्रेशन आहे. २७ मे रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुरस्कार विजेत्यांचा पद्म पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि हास्यसम्राट अभिनेते अशोक सराफ यांचाही पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अशोक यांच्यासोबत निवेदिता सराफ उपस्थित दिसल्या.

Web Title: marathi actor ashok saraf birthday celebration with sachin pilgaonkar and supriya pilgaonkar