भन्नाट आहे Mr & Mrs चौधरींची केमिस्ट्री; अंकुश घरात 'या' हटके पद्धतीने दीपाला हाक मारतो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 12:23 IST2023-07-19T12:21:54+5:302023-07-19T12:23:25+5:30

Deepa parab: प्रत्येक जण आपल्या जवळच्या व्यक्तीला एखाद्या विशिष्ट नावाने हाक मारत असतो. तसंच अंकुश सुद्धा दिपाला अशाच एका हटके स्टाइलमध्ये बोलावतो.

marathi actor ankush choudhary deepa parab | भन्नाट आहे Mr & Mrs चौधरींची केमिस्ट्री; अंकुश घरात 'या' हटके पद्धतीने दीपाला हाक मारतो!

भन्नाट आहे Mr & Mrs चौधरींची केमिस्ट्री; अंकुश घरात 'या' हटके पद्धतीने दीपाला हाक मारतो!

मराठी कलाविश्वात सध्या अभिनेता अंकुश चौधरी आणि दिपा परब-चौधरी ही जोडी सातत्याने चर्चेत येत आहे. अंकुशने आजवरच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे. तर तू चाल पुढं या मालिकेच्या माध्यमातून दिपाने तब्बल १२ वर्षानंतर पुन्हा एकदा सिनेसृष्टीत कमबॅक केलं. इतकंच नाही तर अलिकडेच बाईपण भारी देवा या सिनेमातही ती झळकली. त्यामुळे सध्या दिपाची नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत आहे. यात अलिकडेच तिने लोकमत फिल्मीशी बोलताना अंकुशविषयी भाष्य केलं.

प्रत्येक जण आपल्या जवळच्या व्यक्तीला एखाद्या विशिष्ट नावाने हाक मारत असतो. तसंच अंकुश सुद्धा दिपाला अशाच एका हटके स्टाइलमध्ये बोलावतो. अंकुशने दिपाला कोणतंही टोपणनाव दिलेलं नाही. मात्र, तरीदेखील एका ठराविक पद्धतीची खूण त्याने केल्यावर दिपाला बरोबर कळतं की ही खूण आपल्यासाठीच आहे. 

'अंकुश घरामध्ये तुला कोणत्या नावाने हाक मारतो?' असा प्रश्न दिपाला विचारण्यात आला. त्यावर, अंकुशने मला कोणतंही टोपणनाव दिलेलं नाही. पण, मला बोलवायचं असेल तर तो शिट्टी वाजवतो.

दरम्यान, दिपा आणि अंकुश यांचं लव्हमॅरेज असून त्याची लव्हस्टोरीही भन्नाट आहे. अंकुश आणि दिपाने 2007 साली लग्न केलं. तब्बल दहा वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केले. या दोघांना प्रिन्स नावाचा मुलगा देखील आहे. 
 

Web Title: marathi actor ankush choudhary deepa parab