"सध्या ज्या प्रमाणात घटस्फोट…",लग्नाबद्दल अजिंक्य राऊत स्पष्टच बोलला! म्हणाला -"सहा महिन्यामध्ये वेगळं…"
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 17:39 IST2025-11-05T17:35:41+5:302025-11-05T17:39:36+5:30
लग्नाबद्दल अजिंक्य राऊत नेमकं काय म्हणाला?

"सध्या ज्या प्रमाणात घटस्फोट…",लग्नाबद्दल अजिंक्य राऊत स्पष्टच बोलला! म्हणाला -"सहा महिन्यामध्ये वेगळं…"
Ajinkya Raut: छोटा पडद्यापासून सुरुवात करत ते थेट रुपेरी पडद्यावर झळकणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक नाव म्हणजे अभिनेता अजिंक्य राऊत. अभिनेता अजिंक्य राऊत मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत वेगवेगळ्या मालिकेत काम केलं आहे. अजिंक्यने साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. लवकरच अभिनेता एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. याचनिमित्ताने अजिंक्य वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देताना दिसत आहे. अशातच एका मुलाखतीत अजिंक्यने लग्नाबद्दल केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या लक्ष त्याने आपल्याकडे वेधून घेतलं आहे.
अलिकडेच अजिंक्य राऊतने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने जोडीदाराबद्दल त्याच्या अपेक्षा तसेच तो कधी लग्नबंधनात अडकणार याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. मग आपल्या लग्नाच्या निर्णयाबद्दल अभिनेता म्हणाला,"अजिंक्यकडे भरमसाठ पैसे आले की, अजिंक्य लग्न करेल.कारण,आजच्या तारखेला ज्या प्रमाणात घटस्फोट वगैरे होत आहेत, त्यानुसार तुम्हाला असं वाटतं की, मी पटापट लग्न करावं आणि सहा महिन्यामध्ये वेगळं व्हावं, त्यापेक्षा विचार करून केलेलं, कधीही चांगलं."
त्यानंतर पुढे अजिंक्य म्हणाला,"अर्थात लग्नासाठी मी तयार आहेच, जर ते करायची वेळ आली तर. पण, तशी योग्य व्यक्ती आपल्या आयुष्यात यावी, तशी व्यक्ती कोण तुम्हाला माहित असेल तर फटाफट तुम्ही सजेस्ट करा.' असं स्पष्ट मत अजिंक्यने मुलाखतीत मांडलं.
लग्नसंस्थेबद्दल अजिंक्य काय म्हणाला...
"प्रत्येक वेगवेगळ्या टप्प्यांवर पिढ्यानपिढ्या इतक्या वर्षांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काही गोष्टी बांधल्या गेल्या आहेत. लग्नसंस्थेवर माझा विश्वास आहेच पण, आताची सगळी परिस्थिती आपण ज्या वातावरणात आपण राहत आहोत. शिवाय जे स्वातंत्र्य मुलांना-मुलींनी मिळालंय त्यामुळे लग्नसंस्थेचं रुप बदलतंय का असं मला वाटतंय."असं स्पष्ट मत त्याने मांडलं आहे.
अजिंक्य राऊतने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे, पण, 'मन उडू उडू झालं' मालिकेने त्याला चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली. लवकरच तो दिग्पाल लांजेकरांच्या अभंग तुकाराम चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.