Video: चित्रपटांमध्ये काम करणारा आकाश करतोय शेतात मेहनत; नारळपोफळीच्या बागांमध्ये रमवतोय मनं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 16:53 IST2022-04-04T16:53:10+5:302022-04-04T16:53:46+5:30
Aakash thosar: आतापर्यंत त्याने त्याच्या फोटोशूटपैकी अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यामध्येच आता त्याने चक्क शेतात काम करत असतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.

Video: चित्रपटांमध्ये काम करणारा आकाश करतोय शेतात मेहनत; नारळपोफळीच्या बागांमध्ये रमवतोय मनं
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय प्रिय अभिनेता म्हणजे आकाश ठोसर. सैराट या चित्रपटातून अभिनयाची कारकिर्दी सुरु करणारा आकाश अलिकडेच झुंड या चित्रपटात झळकला. विशेष म्हणजे सध्या आकाश कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही कमालीचा सक्रीय होताना दिसत आहे. आतापर्यंत त्याने त्याच्या फोटोशूटपैकी अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यामध्येच आता त्याने चक्क शेतात काम करत असतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या आकाशने त्याच्या इन्स्टाग्रावर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्ये तो नारळाच्या झाडावरील नारळ काढून ते सोलताना दिसत आहे.
दरम्यान, आकाशचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांना विशेष आवडत आहे. एक सुपरस्टार असूनही आकाशचे पाय अद्यापही जमिनीवर असल्यामुळे लोकांना त्याच्यातील साधेपणा भावत आहे.