कार्तिकच्या पदरात मोठा सिनेमा; ऋतुराज फडकेचं 'झोलझाल'मधून रुपेरी पडद्यावर पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 05:40 PM2022-07-01T17:40:18+5:302022-07-01T17:42:10+5:30

Ruturaj phadke: आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये झळकलेला कार्तिक म्हणजेच ऋतुराज पहिल्यांदाच 'झोलझाल' या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे.

mann udu udu zal fame actor ruturaj phadke aka kartik first marathi movie zolzaal | कार्तिकच्या पदरात मोठा सिनेमा; ऋतुराज फडकेचं 'झोलझाल'मधून रुपेरी पडद्यावर पदार्पण

कार्तिकच्या पदरात मोठा सिनेमा; ऋतुराज फडकेचं 'झोलझाल'मधून रुपेरी पडद्यावर पदार्पण

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील 'मन उडू उडू झालं' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे ऋतुराज फडके(ruturaj phadke). या मालिकेत ऋतुराजने इंद्राच्या भावाची म्हणजेच कार्तिकची भूमिका साकारली आहे. नकारात्मकतेकडे झुकत जाणाऱ्या या भूमिकेला ऋतुराजने उत्तमरित्या न्याय दिला. त्यामुळेच त्याच्या पदरात एक नवाकोरा चित्रपट पडला.

आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये झळकलेला कार्तिक म्हणजेच ऋतुराज पहिल्यांदाच 'झोलझाल' या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. १ जुलै रोजी म्हणजे आज हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. ऋतुराजचा हा पहिलाच चित्रपट असल्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगली आहे.

'झोलझाल' या चित्रपटात ऋतुराजसोबत मराठी कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकार मंडळी झळकली आहेत. त्यामुळे हा चित्रपट ऋतुराजसाठी अत्यंत खास आणि महत्त्वाचा असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे त्याचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी आणि त्याचा उत्साह वाढवण्यासाठी अभिनेता हार्दिक जोशी, सिद्धार्थ जाधव या कलाकारांनीही ऋतुराजसाठी खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या. तसंच हा चित्रपट नक्की पाहा असं आवाहनदेखील जनतेला केलं.

दरम्यान, ऋतुराजच्या फिल्मी करिअरचा पहिला चित्रपट 'झोलझाल' हा नुकताच प्रदर्शित झाला आहे. मानस कुमार दास दिग्दर्शित या चित्रपटात मंगेश देसाई, मनोज जोशी, अजिंक्य देव, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, अमोल कागणे, सयाजी शिंदे, उदय नेने, उदय टिकेकर, अंकुर वाढवे, विश्वजित सोनी, श्याम मसलकर, प्रीतम कागणे, इशा अग्रवाल, अलिशा फरेर, सुप्रिया कर्णिक, प्रियांका खोलगडे, साईशा पाठक ही दिग्गज कलाकार मंडळी झळकले आहेत. 

Web Title: mann udu udu zal fame actor ruturaj phadke aka kartik first marathi movie zolzaal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.