Manasi Naik : "मी किती निराश आहे याची..." नवीन घर घेतल्यानंतर मानसी नाईकची आणखी एक पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 13:09 IST2023-04-25T13:08:33+5:302023-04-25T13:09:28+5:30

मानसीने तिचे काही फोटो पोस्ट करत सविस्तर कॅप्शन लिहिलं आहे.

manasi naik social media post and caption about how she moving on in life | Manasi Naik : "मी किती निराश आहे याची..." नवीन घर घेतल्यानंतर मानसी नाईकची आणखी एक पोस्ट चर्चेत

Manasi Naik : "मी किती निराश आहे याची..." नवीन घर घेतल्यानंतर मानसी नाईकची आणखी एक पोस्ट चर्चेत

मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईकने (Manasi Naik) नुकतेच नवीन घर खरेदी केले. नव्या घरात प्रवेश करताना तिने व्हिडिओ पोस्ट केला. तसंच स्वयंपाक करतानाचाही एक व्हिडिओ पोस्ट केला. घराची झलकही दाखवली. यानिमित्ताने मानसीला सगळेच शुभेच्छा देत आहेत. काही महिन्यांपूर्वीच मानसीचा प्रदीप खरेरासोबत घटस्फोट झाला. नुकतेच मानसीने तिचे आणखी काही फोटो पोस्ट करत सविस्तर कॅप्शन लिहिलं आहे.

गेल्या काही महिन्यांत मानसीच्या आयुष्यात अनेक बदल झाले. त्यात घटस्फोटामुळे तिला कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागले. आता तिने पुन्हा नव्याने सुरुवात केली आहे. तिचं स्वत:चं नवं घर हे त्यातलंच पहिलं पाऊल आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिलं,

“स्वत:च्या स्वार्थासाठी परमार्थ करत आहे. नवे रस्ते शोधण्यासाठी जुन्या वाटेने जात आहे.
विश्वासाने विश्वास ठेवते कुणावर,अविश्वासाने संशय घेते, त्यावर सत्याच्या वाटेने जाण्यासाठी असत्याची कास धरावी लागते,
खरं खोटं जाणण्यासाठी देवालाच हाक द्यावी लागते.
माझं सारं खरं खोटं देवालाच ठाऊक आहे.
म्हणूनच माझा त्याच्यावर विश्वास आहे.
भावनांचा विचार केला तर माझं मन एक दगड आहे, मनाच्या या दगडाला प्रामाणिकतेचा पैलू आहे.
प्रामाणिकपणे या दगडाला एक एक पैलू पडत आहे, हिरा होईल ना होईल या दगडाची किंमत वाढवत आहे.

आपण आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला पाहिजे. ते आपोआप होणार नाही. तुम्हाला स्वत:ला उठून निश्चय करावा लागेल, हे किती कठीण आहे, याची मला पर्वा नाही. मी किती निराश आहे, याची मला पर्वा नाही. मी माझ्याकडून सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत आहे. मी माझ्या आयुष्यात पुढे जात आहे'

मानसीने लिहिलेलं हे कॅप्शन जगण्याची उमेद देणारं आहे. ती मागचं सगळं काही विसरुन आता पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी तिच्या चाहत्यांनी कमेंट करत तिला पाठिंबा दिला आहे. 

Web Title: manasi naik social media post and caption about how she moving on in life