प्रेम, विश्वासघात अन् जिद्द; 'माझी प्रारतना' सिनेमाचा टीझर रिलीज, उपेंद्र लिमयेच्या भूमिकेने वेधलं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 13:16 IST2025-03-24T13:15:39+5:302025-03-24T13:16:03+5:30
उपेंद्र लिमयेची भूमिका असलेल्या 'माझी प्रारतना' सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे (majhi prarthana)

प्रेम, विश्वासघात अन् जिद्द; 'माझी प्रारतना' सिनेमाचा टीझर रिलीज, उपेंद्र लिमयेच्या भूमिकेने वेधलं लक्ष
मराठी मनोरंजन विश्वात अनेक नवनवीन विषयांवरील सिनेमे येत आहेत. यापैकी एका सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या सिनेमाचं नाव 'माझी प्रारतना'. प्रेम म्हणजे जीवनात प्रत्येक गोष्टीत सौंदर्य शोधण्याची कला, पण सर्वांंना प्रेम सहज मिळत नाही. अशीच एक अभूतपूर्व प्रेमकथा 'माझी प्रारतना' सिनेमात आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. पद्माराज राजगोपाल नायर लिखित आणि दिग्दर्शित 'माझी प्रारतना' या सिनेमाचा दमदार टीझर प्रदर्शित झालाय.
'माझी प्रारतना'च्या टीझरमध्ये काय?
प्रेम, प्रेमातील विश्वासघात आणि त्या विकट परिस्थितीत प्रेम मिळवण्यासाठीची जिद्द या टिझर मध्ये पहायला मिळते. "माझी प्रारतना" हा सिनेमा ब्रिटिश काळात, महाराष्ट्राच्या अगदी ग्रामीण भागात घडलेली संगीत प्रधान प्रेम कथा आहे. आयुष्यात किती ही अडचणी असतील तरी प्रेम मात्र जीवनात सर्वकाही जिंकण्याची ताकद आहे अशी स्तब्ध करणारी हि कहाणी आहे. सिनेमाच्या टीझरमध्ये उपेंद्र लिमयेची खास भूमिका प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतेय.
या तारखेला प्रदर्शित होणार 'माझी प्रारतना'
'माझी प्रारतना' चित्रपटात पद्माराज राजगोपाल नायर आणि अनुषा अडेप हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. मराठी सिनेश्रुष्टीतील आणखी काही उत्कृष्ट कलाकार आपल्याला दिसणार आहेत. एस आर एम फिल्म स्कूल प्रस्तुत "माझी प्रारतना" या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन पद्माराज राजगोपाल नायर ह्यांनी केलं आहे, पद्माराज नायर फिल्म्स ह्यांची निर्मिती आहे तर विश्वजित सी टी ह्यांनी संगीत दिलंय. सिनेमाचं पोस्टर आणि आता टिझर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. हा सिनेमा ९ मे २०२५ ला आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.