महेश मांजरेकरांच्या 'पुन्हा शिवाजी राजे भोसले' सिनेमाला प्रेक्षकांची पसंती, पहिल्याच दिवशी केली 'इतकी' कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 09:01 IST2025-11-01T08:58:07+5:302025-11-01T09:01:58+5:30
Punha Shivajiraje Bhosale Box Office Collection: 'पुन्हा शिवाजी राजे भोसले' सिनेमाची पहिल्या दिवसाची कमाई किती? आकडेवारी आली समोर

महेश मांजरेकरांच्या 'पुन्हा शिवाजी राजे भोसले' सिनेमाला प्रेक्षकांची पसंती, पहिल्याच दिवशी केली 'इतकी' कमाई
Punha Shivajiraje Bhosale Frist Day Collection: महेश मांजरेकर हे मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शकांपैकी एक आहेत.त्यांनी आजवर वेगवेगळ्या विषयांवर आधारित असलेल्या चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे. सध्या ते पुन्हा शिवाजी राजे भोसले या चित्रपटामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. काल ३१ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अशातच या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.
दरम्यान, महेश मांजरेकरांनी बळीराजाच्या अस्तित्वाची आर्त हाक या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी तमाम महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहचवण्याचं काम केलं आहे. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ बोडके प्रमुख भूमिकेत आहे. या शिवाय सयाजी शिंदेपृथ्वीक प्रताप, रोहित माने, मंगेश देसाई या कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. तसेच बालकलाकार त्रिशा ठोसर, भार्गव जगताप हे देखील महत्वाच्या भूमिकेत आहेत.
'पुन्हा शिवाजी राजे भोसले' या चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांच्या मनात त्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. त्यानंतर आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला प्रेक्षक तितकाच चांगला प्रतिसाद देत आहेत. पुन्हा शिवाजी राजे भोसले पहिल्याच दिवशी किती कमाई केली जाणून घेऊया. या चित्रपटाने पहिल्याच चांगली सुरुवात केली आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, पुन्हा शिवाजी राजे भोसले पहिल्याच दिवशी १९ लाख रुपयांचा गल्ला जमवत आपलं खातं उघडलं आहे.
'पुन्हा शिवाजी राजे भोसले' च्या माध्यमातून मांजरेकरांनी वर्तमानातील ज्वलंत विषयाला इतिसाशी भावनिक वळणानं जोडत कथानक पडद्यावर मांडण्यात आलं आहे. त्याचबरोबर महाराजांचं स्वर्गलोकातून पृथ्वीवर पुन्हा येणं, हा चित्रपटातील मांजरेकरी टच मनाला भिडणारा आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.