Shivali Parab: छोटा पॅकेट, बडा धमाका...! कधीही पाहिलं नसेल ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचं इतकं बोल्ड रूप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 16:52 IST2022-10-27T16:51:58+5:302022-10-27T16:52:44+5:30
Maharashtrachi Hasyajatra, Shivali Parab: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने शिवाली परबला खरी ओळख दिली. हीच शिवाली सध्या तिच्या बोल्ड व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे...

Shivali Parab: छोटा पॅकेट, बडा धमाका...! कधीही पाहिलं नसेल ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचं इतकं बोल्ड रूप
‘छोटा पॅकेट, बडा धमाका’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाली परबला (Shivali Parab) आताश: कोण ओळखत नाही? कल्याणची ही छोकरी आता घराघरात पोहोचली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून (Maharashtrachi Hasyajatra) ती प्रेक्षकांना खळखळून हसवते. शिवालीने फारच कमी वेळात हास्यजत्रेत आपलं स्थान निर्माण केलं. व्हॉट्सअॅप लग्न आणि वेक अप या चित्रपटात ती झळकली. हृदयात वाजे समथिंग या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली. पण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने तिला खरी ओळख दिली. हीच शिवाली सध्या तिच्या बोल्ड व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे.
होय, ‘प्रेमप्रथा धूमशान’ या चित्रपटातील एका गाण्यात शिवालीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतोय. या चित्रपटाचं ‘काय उमगेना’ या गाण्यात शिवाली लीपलॉक सीन देताना दिसतेय. या गाण्यातील शिवालीचा बोल्ड अंदाज पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
शिवालीचा जन्म 10 मे 1998 ला झाला आहे, शिवालीचे संपूर्ण शिक्षण कल्याण मधील श्रीमती वेणूबाई अंबोपावशे या शाळेमध्ये झालं आहे. शाळेत असल्यापासून शिवालीला नृत्य आणि अभिनयाची आवड होती. कॉलेजमध्ये असताना शिवालीने अनेक फेस्टिवल गाजवला आणि तिथूनच शिवालीने अभिनयाला सुरुवात केली. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’मध्ये येण्यापूर्वी शिवाली अनेक नाटकांमध्ये आणि वेब सीरिजमध्ये झळकली. ‘हृदयात वाजे समथींगल’ ही तिची पहिली मालिका गाजली आणि त्या नंतर शिवाली ‘बॅक बेंचर’ या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. शिवालीला ‘महाराष्ट्राची हास्य जत्रे’मुळे चुलबुल पांडे म्हणून नवीन ओळख मिळाली. शिवाली स्टेजवर आल्या आल्या हास्याचे कारंजे उडतात, हेच तिचं यश आहे.