महेश काळे यांच्या स्वरांनी दुमदुमला प्रयागराज, गंगेत मारली डुबकी, शेअर केला महाकुंभमेळ्याचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 12:30 IST2025-02-08T12:29:05+5:302025-02-08T12:30:31+5:30

महाकुंभमेळ्याचा अनुभव महेश काळेंनी व्हिडिओतून शेअर केला आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

maha kumbh mela 2025 mahesh kale perform in prayagraj kumbh mela shared video | महेश काळे यांच्या स्वरांनी दुमदुमला प्रयागराज, गंगेत मारली डुबकी, शेअर केला महाकुंभमेळ्याचा अनुभव

महेश काळे यांच्या स्वरांनी दुमदुमला प्रयागराज, गंगेत मारली डुबकी, शेअर केला महाकुंभमेळ्याचा अनुभव

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. जगभरातून लोक या महाकुंभमेळ्याचा अनुभव घेण्यासाठी येत आहेत. अनेक सेलिब्रिटीही १४४ वर्षांतून एकदा होणाऱ्या या महाकुंभमेळ्याचा विलक्षण अनुभव घेण्यासाठी प्रयागराजला पोहोचले आहेत. प्रसिद्ध मराठी गायक महेश काळेदेखील प्रयागराजला गेले होते. 

महाकुंभमेळ्याचा अनुभव महेश काळेंनी व्हिडिओतून शेअर केला आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत त्यांनी विलक्षण अनुभव सांगितला आहे. महेश काळेंनी महाकुंभमेळ्यात सहभागी होत गंगेत डुबकी मारत स्नान केलं. त्यांनी केवळ गंगेत डुबकीच मारली नाही तर महाकुंभमेळ्यात त्यांनी त्यांच्या स्वरांनी भाविकांचे कान तृप्त केले. महेश काळे यांच्या सुरेल आवाजाने प्रयागराज नगरी दुमदुमली. 


"डोळे बंद करून मी गंगेत उभा राहिलो...त्या क्षणी माझ्या इच्छा पूर्ण झाल्याचा अनुभव मला आला", असं त्यांनी व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे. महेश काळे यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

Web Title: maha kumbh mela 2025 mahesh kale perform in prayagraj kumbh mela shared video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.