"देखणं रुपडं आहेच पण या सिनेमात पठ्ठ्याने..."; ललिल-हृताचा 'आरपार' पाहून मधुगंधाची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 17:38 IST2025-09-13T17:37:56+5:302025-09-13T17:38:30+5:30
'आरपार' सिनेमा पाहून अभिनेत्री-निर्माती मधुगंधा कुलकर्णीने सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे

"देखणं रुपडं आहेच पण या सिनेमात पठ्ठ्याने..."; ललिल-हृताचा 'आरपार' पाहून मधुगंधाची पोस्ट चर्चेत
ललित प्रभाकर आणि हृता दुर्गुळे या दोघांची प्रमुख भूमिका असलेला 'आरपार' हा सिनेमा रिलीज झालाय. हा सिनेमा प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळवतोय. ललित-हृता या दोघांच्या हटके केमिस्ट्रीला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देत आहेत. अशातच ललितची ऑनस्क्री वहिनी अर्थात जुळुन येती रेशीमगाठी फेम अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णीने 'आरपार' सिनेमा पाहून तिची प्रतिक्रिया दिली आहे. मधुगंधाने सोशल मीडियावर याविषयी खास पोस्ट केली आहे.
मधुगंधी लिहिते, ''ललितचा पिक्चर आला म्हणून बघितला. वेडसर प्रेम बघण्याची मजा काही औरच असते. गौरव पत्की चा पहिला प्रयत्न खूपच कौतुकास्पद आहे. टेक्निकली सगळं perfect! माधव अभ्यंकर सर, सुहिता थत्ते, स्नेहलता वसईकर, पाहुणे कलाकार म्हणून सुहास शिरसाट सगळे कलाकार उत्तमच! सगळ्यात कमाल वाटली ती आमच्या भावड्या ललितची! जुळून येती रेशीमगाठीला आमची राखी बांधली गेली हातावर, तेव्हा पासून मी त्याला माणूस म्हणून आणि नट म्हणून नेटानं आणि निष्ठेन काम करताना पाहत आले आहे. किती ग्रो झाला आहे आपला भावड्या...काय रेंज...''
''चि व चि सौ का ह्या माझी निर्मिती असलेल्या चित्रपटातून तू पदार्पण केलेस...ते आता आर पार मधे निर्माता म्हणून आलास...किती मोठी झेप...किती मेहनत...किती समर्पण...देखणं रूपडं तर आहेच पण अभिनय लाजवाब. आर पार मधे खिळवून ठेवलं पाठ्यानं. ललित तुझं खूप कौतुक अभिमान आणि प्रेम ...आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझं स्वागत...निर्माता म्हणून ! Welcome to the club !''
''ऋता उत्तम अभिनेत्री आहेच आणि ह्या चित्रपटात दोघांची केमिस्ट्री लाजवाब!थोडा पक्षपात आहेच...भावाचा सिनेमा आहे.. अवश्य बघा... लव स्टोरीज कायम वर्क होतात. आर पार भिडणारी ही आजच्या तरुणाईची सुंदर फिल्म. ललित खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या आणि चित्रपटासाठी!'', अशाप्रकारे मधुगंधाने पोस्ट लिहून ललितला आणि 'आरपार' सिनेमाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.