लक्ष्याची लेक स्वानंदीला पाहिलंत का? अभिनय बेर्डेने दिल्या बहिणीला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 13:07 IST2023-07-27T13:06:54+5:302023-07-27T13:07:39+5:30
अभिनय आणि स्वानंदी या बहीण भावांचा एकमेकांसोबत खूपच खास बाँड आहे.

लक्ष्याची लेक स्वानंदीला पाहिलंत का? अभिनय बेर्डेने दिल्या बहिणीला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा
आपल्या विनोदी अभिनयाने सर्वांचंच मन जिंकणारा लक्ष्या म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डेची (Laxmikant Berde) आजही चाहते आठवण काढतात. लक्ष्या आणि अशोक मामांची जोडी तर कमाल होती. आज अशोक सराफ कोणत्याही कार्यक्रमात आले की लक्ष्याची आठवण आवर्जुन येतेच. लक्ष्मीकांत बेर्डे आणि पत्नी प्रिया बेर्डे यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा अभिनय बेर्डे (Abhinay Berde) अभिनेता असून त्याची धाकटी बहीण स्वानंदीचा (Swanandi Berde) आज वाढदिवस आहे. यानिमित्त अभिनयने मजेशीर फोटो पोस्ट करत बहिणीला हटके शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनय आणि स्वानंदी या बहीण भावांचा एकमेकांसोबत खूपच खास बाँड आहे. अभिनयने शेअर केलेल्या फोटो, व्हिडिओमधून ते लक्षात येतंय. अभिनयने स्वानंदीचे लहानपणीचे काही फोटो शेअर केलेत. तसंच तिचे आताचे काही मजेशीर फोटो, तिला छळतानाचा व्हिडिओ त्याने शेअर केला आहे. या फोटोंना कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, 'हॅपी बर्थडे स्वानंदी..मी आज काहीच टिपीकल लिहिणार नाहीए कारण तुला माहितीये माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते..फक्त लोकांच्या मनोरंजनासाठी तुझे काही गोड फोटो टाकतोय. अशीच गोंडस राहा..पुन्हा हॅपी बर्थडे.'
अभिनयच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत बहीण भावाच्या या गोड नात्याचं कौतुक केलंय. अभिनेता प्रियदर्शन जाधवने कमेंट करत लिहिले, 'हाहा..फोटो म्हणजे...असो स्वानंदी हॅपी बर्थडे'. तर स्वानंदीने 'मी नि:शब्द झाले केवढं ते प्रेम' अशी कमेंट केली आहे.
अभिनय लवकरच 'वडापाव' या मराठी सिनेमात झळकणार आहे. याशिवाय संजय जाधवच्या सिनेमातही त्याची वर्णी लागली आहे. तर स्वानंदीने 'धनंजय माने इथेच राहतात का' या नाटकात काम केले आहे.