काय सांगता! ललित प्रभाकर वापरत नाही Whatsapp, हृता दुर्गुळेचा मोठा खुलासा, म्हणाली-

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 16:09 IST2025-09-11T16:09:12+5:302025-09-11T16:09:37+5:30

'आरपार' सिनेमाच्या निमित्ताने ललित प्रभाकरविषयी हृताने खास खुलासा केला. जो ऐकून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत

lalit prabhakar dont use whatsappp hruta durgule revealed aarpar marathi movie | काय सांगता! ललित प्रभाकर वापरत नाही Whatsapp, हृता दुर्गुळेचा मोठा खुलासा, म्हणाली-

काय सांगता! ललित प्रभाकर वापरत नाही Whatsapp, हृता दुर्गुळेचा मोठा खुलासा, म्हणाली-

सध्या 'आरपार' सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत. या सिनेमाननिमित्त हृता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकमेकांसोबत काम करत आहे.  हृता आणि ललित या सिनेमाच्या निमित्ताने विविध माध्यमात मुलाखती देत आहेत. अशातच एका मुलाखती दरम्यान ललित प्रभाकर व्हॉट्सअॅप वापरत नाही याचा खुलासा झाला आहे. हृताने स्वतःच हा खुलासा केलाय. जाणून घ्या

ललित प्रभाकर वापत नाही व्हॉट्सअॅप

हृता आणि ललितने नवशक्तीला दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सर्वांसोबत शेअर केला. हृता म्हणाली- ''तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण ललितकडे व्हॉट्सअॅप नाहीये. आतापर्यंत आमचे एकमेकांबद्दलचे मेसेज एवढेच आहेत की, हॅपी बर्थडे पार्टनर. १२ सप्टेंबर २०२०, १२ सप्टेंबर २०२१. आता आमची जरा बरी मैत्री झाली आहे. आताच मैत्री झालीये, आधी आम्ही मित्र नव्हतो. बरं झालं, आम्ही दोघेही असे आहोत. कारण उगाच आपण ज्याच्यासोबत काम करतोय, त्याला मित्र म्हणणं हा आम्हा दोघांचाही स्वभाव नाहीये.''

अशाप्रकारे हृता आणि ललितने खुलासा केला. हृता आणि ललित या दोघांच्या 'आरपार' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. रोमँटिक कथा असलेल्या या सिनेमात ललित व ऋता यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे. ‘प्रेमात अधलं मधलं काही नसतं', याचे वर्णन दर्शविणारा हा सिनेमा आहे. या चित्रपटाची खास बात म्हणजे हा सिनेमा सिनेप्रेमींच्या भेटीसाठी एका खास दिवशी येणार आहे. उद्या अर्थात १२ सप्टेंबरला रिलीज होणाऱ्या 'आरपार' सिनेमाला प्रेक्षकांचं कसं प्रेम मिळेल,  याची सर्वांना उत्सुकता आहे.

English summary :
Actress Hruta Durgule revealed that actor Lalit Prabhakar doesn't use WhatsApp. She shared her experience working together in the movie 'Aar Paar'. Their friendship has grown now, and the movie is releasing on September 12th.

Web Title: lalit prabhakar dont use whatsappp hruta durgule revealed aarpar marathi movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.