'कशी आहे ही?' उर्मिलाला पाहताच क्रांतीची अशी होती प्रतिक्रिया; सांगितला मैत्रीचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2023 12:25 IST2023-03-12T12:24:00+5:302023-03-12T12:25:08+5:30

दोन अभिनेत्री कधीच मैत्रिणी असू शकत नाही असं म्हणतात.

kranti redkar and urmila kothare friendship urmila showed attitude to kranti at the very first time | 'कशी आहे ही?' उर्मिलाला पाहताच क्रांतीची अशी होती प्रतिक्रिया; सांगितला मैत्रीचा किस्सा

'कशी आहे ही?' उर्मिलाला पाहताच क्रांतीची अशी होती प्रतिक्रिया; सांगितला मैत्रीचा किस्सा

दोन अभिनेत्री कधीच मैत्रिणी असू शकत नाही असं म्हणतात. पण विचार जुळले की मैत्री आपोआप होतेच की. एखाद्याला ओळखण्यात सुरुवातील चूक होते मात्र तीच मैत्री नंतर घट्ट होते. मराठीतील दोन अभिनेत्रींच्या बाबतीत असंच काहीसं घडलं आहे. क्रांती रेडकर (Kranti Redkar) आणि उर्मिला कोठारे (Urmila Kothare) या दोन अभिनेत्रींच्या मैत्रीची सुरुवात कशी झाली याचा किस्सा क्रांतीने नुकतंच एका कार्यक्रमात सांगितला आहे.

प्लॅनेट मराठीच्या (Planet Marathi) 'पटलं तर घ्या' या शो मध्ये क्रांतीने उर्मिलासोबतच्या मैत्रीचा खुलासा केला आहे. क्रांती म्हणाली, 'मी पुण्याला असताना हॉटेल रुममध्ये उर्मिलाचा सिनेमा लागला होता. मला ती खूपच गोड वाटली. तिच्या चेहऱ्यावर शांतता होती. नंतर औरंगाबादला एका पुरस्कार सोहळ्यावेळी जो हॉल होता तिथे ५० अभिनेत्री एकाचवेळी मेकअप करु शकत होत्या. गोंधळाचं वातावरण होतं. प्रत्येकजण ओरडत होता. कुणाला खुर्च्या तर कुणाला पाण्याच्या बाटल्या मिळत नव्हत्या. पण माझ्या शेजारी बसलेली एक अभिनेत्री शांतपणे मेकअप करत होती. मी पाहिलं तर ती उर्मिलाच होती. बाकीच्यांनी काय करायचं ते करा ती आपली तिच्या मेकअपमध्ये व्यस्त होती असा तिचा अॅटिट्यूड होता. मी तिला विचारलं, 'तुझा हा ब्रश घेऊ शकते का?' यावर तिने मला फक्त एक लुक दिला आणि होकारार्थी मान डोलावली. पुन्हा ती मेकअपमध्ये व्यस्त झाली.'

क्रांती पुढे म्हणाली, 'मी तर तिच्याकडे बघतच बसले. म्हणलं ही अशी काय. हिच्याशी कधीही बोलायला नको. किती अॅटिट्युड दाखवते आहे. नंतर 'नच बलिये'वेळी आमची पुन्हा भेट झाली तेव्हा मी एका गोष्टीवरुन कमेंट पास केली, तर ही माझ्याकडे बघून म्हणाली, 'हो ना!' तेव्हा मला कळलं अरे ही आपल्यासारखीच आहे. मग आमची मैत्री झाली. ती आजपर्यंत टिकून आहे.'

Web Title: kranti redkar and urmila kothare friendship urmila showed attitude to kranti at the very first time