"सूरजला नाही, पण महाराष्ट्राच्या जनतेला मी..." 'झापुक झुपूक'च्या अपयशावर केदार शिंदे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 15:59 IST2026-01-20T15:58:33+5:302026-01-20T15:59:58+5:30

सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक'च्या अपयशाबद्दल काय म्हणाले केदार शिंदे?

Kedar Shinde Talks About Zapuk Zupuk Movie Box Office Collection Suraj Chavan | "सूरजला नाही, पण महाराष्ट्राच्या जनतेला मी..." 'झापुक झुपूक'च्या अपयशावर केदार शिंदे म्हणाले...

"सूरजला नाही, पण महाराष्ट्राच्या जनतेला मी..." 'झापुक झुपूक'च्या अपयशावर केदार शिंदे म्हणाले...

मराठी चित्रपटसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक केदार शिंदे सध्या त्यांच्या 'अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. स्त्रीप्रधान कथांना व्यावसायिक यशाची जोड देणाऱ्या केदार शिंदे यांनी यावेळी सासू-सुनेच्या नात्याकडे पाहण्याचा पारंपरिक चष्मा बाजूला ठेवला आहे. या चित्रपटाला थिएटरमध्येही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अशातच एका मुलाखतीत त्यांनी 'झापुक झुपूक'ला प्रेक्षकांनी नाकारल्यामुळे मिळालेल्या अपयशावर प्रतिक्रिया दिली आहे. 

'बिग बॉस'च्यावेळी सूरज चव्हाणवर प्रेम केलेल्या प्रेक्षकांनी 'झापुक झुपूक' सिनेमाकडे पाठ फिरवली. याबद्दल केदार शिंदे यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. नुकतंच केदार शिंदेंनी 'झापुक झुपूक'च्या अपयशावर महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, "मी एका वाहिनीवर जाहीरपणे सांगितलं होतं की मी सूरजसोबत सिनेमा करणार. हा शब्द मी केवळ त्या मुलाला दिला नव्हता, तर महाराष्ट्रातल्या जनतेला दिला होता. मग त्यात माझा फायदा होवो वा नुकसान, दिलेला शब्द पूर्ण करणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं".

'बाईपण भारी देवा' प्रमाणे 'झापुक झुपूक'ला मोठे यश मिळाले नाही, या प्रश्नावर केदार शिंदे म्हणाले, "प्रेक्षकांनी हा सिनेमा स्वीकारला नाही, हे खरं आहे. पण तो सिनेमा उगाच केला, असं मला कधीच वाटलं नाही. कोणताही दिग्दर्शक कधीच 'वाईट सिनेमा करूया' असं ठरवून काम करत नाही. कधी गोष्टी जुळून येतात, तर कधी नाही", असं केदार शिंदे यांनी म्हटलं. आपल्या कामाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, चित्रपटसृष्टीत यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. "मी या गोष्टींकडे फारसं लक्ष देत नाही. यश मिळालं तरी आणि अपयश आलं तरी, मी ते अत्यंत शांतपणे स्वीकारतो" असेही ते म्हणाले. 
 

Web Title : केदार शिंदे ने 'झापुक झुपुक' की असफलता पर की बात, जनता से वादा निभाया।

Web Summary : निर्देशक केदार शिंदे ने 'झापुक झुपुक' की असफलता पर बात की, जनता से किए वादे को निभाने पर जोर दिया, फिल्म की प्रतिक्रिया के बावजूद। वह सफलता और असफलता दोनों से अप्रभावित हैं।

Web Title : Kedar Shinde reflects on 'Zhapuk Zhupuk' failure, commitment to public.

Web Summary : Director Kedar Shinde addresses the failure of 'Zhapuk Zhupuk,' emphasizing his commitment to fulfilling promises made to the public, despite the film's reception. He remains unfazed by both success and failure.