यंदा कर्तव्य आहे? अभिनेता भूषण प्रधानच्या 'त्या' पोस्टने वेधलं लक्ष; थेट तारीख केली जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 18:45 IST2026-04-13T18:44:23+5:302026-04-13T18:45:08+5:30
भूषण प्रधानचंही ठरलं? अभिनेत्याने शेअर केलेल्या पोस्टने चर्चांना उधाण, थेट तारीख सांगत म्हणाला...

यंदा कर्तव्य आहे? अभिनेता भूषण प्रधानच्या 'त्या' पोस्टने वेधलं लक्ष; थेट तारीख केली जाहीर
Bhushan Pradhan Post : भूषण प्रधान हा सध्या मराठी सिनेविश्वातील आघाडीचा अभिनेता आहे. भूषणने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आजवर त्याने अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.मराठी चित्रपटसृष्टीतील हॅण्डसम हंक म्हणून तो ओळखला जातो. उत्तम अभिनयासोबतच भूषणच्या एका स्माइलवर अनेक तरुणी घायाळ होतात. भूषणचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. सध्या अभिनेता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.
भूषण प्रधान सोशल मीडियावर कमालीची सक्रिय आहे. या माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स तो चाहत्यांना देत असतो. अशातच नुकतीच भुषण प्रधानने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दरम्यान, भूषणने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली."तारीख लक्षात ठेवा... २४ जुलै २०२६, आमच्या या प्रवासाचे साक्षीदार व्हा," अशी पोस्ट भूषणने शेअर केली आहे. शिवाय या फोटोमध्ये अभिनेत्याने त्याच्या प्री-वेडिंग फोटोशूटसारखी पोझ दिल्याचं दिसत आहे. या फोटोंमुळे अभिनेत्याच्या लग्नाबद्दल सोशल मीडियावर रंगल्या आहेत. मात्र, भूषणने याविषयी मौन बाळगलं आहे. भूषणची ही पोस्ट पाहून चाहते संभ्रमात पडले आहेत.
अभिनेत्याची ही पोस्ट पाहून काही चाहत्यांनी कमेंटमध्ये प्रश्न विचारला आहे. "नवीन चित्रपट की लग्न?", तर काहींनी भूषणवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. आता भूषण खरंच लग्न करणार आहे का? की हा त्याच्या कोणत्या प्रोजेक्टच्या प्रमोशनचा हा भाग आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
भूषण प्रधान हा मराठीतील लोकप्रिय अभिनेता असून त्याने चित्रपटांसोबत वेब सीरिजमध्येदेखील काम केलं आहे. ‘आम्ही दोघी’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘सतरंगी रे’, ‘मिस मॅच’, ‘टाइमपास’, ‘टाइमपास २’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केलंय.