iPhone 17: स्वप्नील जोशीने घेतला iPhone 17 Pro Max, चाहते म्हणाले- "मोदी म्हणतात स्वदेशी वापरा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 12:55 IST2025-09-19T12:54:31+5:302025-09-19T12:55:29+5:30

अनेक सेलिब्रिटीही apple कंपनीच्या आयफोनच्या प्रेमात आहेत. भगव्या रंगाचा iPhone 17 Pro Max मराठी अभिनेता स्वप्नील जोशीनेही खरेदी केला आहे. 

iPhone 17 marathi actor Swapnil Joshi bought iPhone 17 Pro Max orange color shared unboxing video | iPhone 17: स्वप्नील जोशीने घेतला iPhone 17 Pro Max, चाहते म्हणाले- "मोदी म्हणतात स्वदेशी वापरा..."

iPhone 17: स्वप्नील जोशीने घेतला iPhone 17 Pro Max, चाहते म्हणाले- "मोदी म्हणतात स्वदेशी वापरा..."

सध्या apple कंपनीच्या नव्या आयफोनची सगळीकडे क्रेझ पाहायला मिळत आहे. अॅपलने त्यांचा नवा iPhone 17 फोन बाजारात आणला आहे. आजपासून iPhone 17 आणि iPhone 17 Pro Maxची बाजारात विक्री सुरू झाली आहे. अनेक सेलिब्रिटीही apple कंपनीच्या आयफोनच्या प्रेमात आहेत. या नव्या आयफोनमध्ये अनेक नवे फिचरही देण्यात आले आहेत. iPhone 17 आता भगव्या रंगातही उपलब्ध आहे. या फोनची सर्वत्र चर्चा आहे. भगव्या रंगाचा iPhone 17 Pro Max मराठी अभिनेता स्वप्नील जोशीनेही खरेदी केला आहे. 

स्वप्नील जोशीने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन नवीन iPhone 17 Pro Max घेतल्यानंतर व्हिडीओ शेअर केला आहे. स्वप्नील त्याच्या या नव्या फोनच्या प्रेमात आहे. या व्हिडीओत स्वप्नील नवीन आयफोनचं अनबॉक्सिंग करताना दिसत आहे. "ओ रेंज हाय...वर्षातला तो दिवस आला...आयफोन १७ प्रो मॅक्स", असं त्याने व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत अभिनेत्याचं अभिनंदन आहे. 


"आमच्याकडे नाही इकडे पाठव तो फोन", "दादा तुझा जुना आयफोन मला दे", "घेतला बुवा एकदाचा" अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. तर एका युजरने "मोदी सांगतात भारतीय वस्तू वापरा आणि आपण कौतुकाने apple चे reel करतोय!", अशी कमेंट केली आहे. सुप्रिया पिळगावकर यांनीही स्वप्नीलच्या या व्हिडीओवर कमेंट केली आहे. "१६ पासून ते १७ पर्यंत...बरोबर एक वर्ष", अशी कमेंट सुप्रिया यांनी केली आहे. 

किंमत किती आहे?
आयफोन १७ ची २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ८२ हजार ९०० रुपये आहे. आयफोन एअरची किंमत १ लाख १९ हजार ९०० रुपये आहे. आयफोन १७ प्रो आणि आयफोन १७ प्रो मॅक्स अनुक्रमे १ लाख ३४ हजार ९०० रुपये आणि १ लाख ४९ हजार ९०० रुपयांत उपलब्ध आहे. कंपनीने सर्व फोन २५६ जीबीच्या बेस व्हेरिएंटमध्ये लॉन्च केले आहेत.काही देशांमध्ये, ऑनलाइन प्री-ऑर्डर दरम्यान आयफोन १७ प्रो आणि १७ प्रो मॅक्स विकले गेले, ज्यामुळे ऑक्टोबरपर्यंत डिलिव्हरी लांबल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, ग्राहक अजूनही थर्ड-पार्टी स्टोअरमधून आयफोन १७ खरेदी करू शकतात.

Web Title: iPhone 17 marathi actor Swapnil Joshi bought iPhone 17 Pro Max orange color shared unboxing video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.