International Yoga Day 2019 : योगाभ्यासाचे धडे देतायेत लक्ष्या आणि अशोक मामा, हा व्हिडिओ पाहून आवरणार नाही हसू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 14:01 IST2019-06-21T14:01:16+5:302019-06-21T14:01:49+5:30
लक्ष्मीकांत बेर्डे व अशोक सराफ यांचा योगा करतानाचा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

International Yoga Day 2019 : योगाभ्यासाचे धडे देतायेत लक्ष्या आणि अशोक मामा, हा व्हिडिओ पाहून आवरणार नाही हसू
आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस असून सोशल मीडियावर सेलिब्रेटींचे योगा करतानाचे व्हिडिओ व फोटो पहायला मिळत आहेत. तर सोशल मीडियावर दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे व अभिनेते अशोक सराफ यांचा योगा करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ खूप मजेशीर असून हा व्हिडिओ बाळाचे बाप ब्रह्मचारी चित्रपटातील आहे.
झी टॉकिजने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने बाळाचे बाप ब्रह्मचारी चित्रपटातील एक सीन शेअर केला आहे आणि लिहिलं की, योगाभ्यास कसा असावा याचे धडे देतायेत लक्ष्या आणि अशोक मामा...😂😂 आजच्या आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त 'बाळाचे बाप ब्रम्हचारी' या चित्रपटातील हा Scene.
या व्हिडिओत एका कार्यक्रमात लक्ष्मीकांत बेर्डे योगाची आसनं करून दाखवत आहेत. पण ते एकट्यानं योगा करत नसून स्वतः दिसत आहेत. पण पाय अशोक सराफ यांचे आहेत. समोरच्या प्रेक्षकांना याची अजिबात कल्पना नसल्यामुळे ते आसनं पाहून टाळ्या वाजवत आहेत. हा व्हिडिओ पाहून नक्कीच तुम्हाला हसू आवरणार नाही.
लक्ष्मीकांत बेर्डे व अशोक सराफ यांनी मराठी चित्रपटसृष्टीत अशा बऱ्याच सिनेमात एकत्र काम करून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलंय. त्यांच्या चित्रपटांतील काही सीन आजही रसिकांच्या मनात घर करून कायम आहेत.