'झपाटलेला' सिनेमातील 'ओम फट् स्वाहा' डायलॉगमागची इंटरेस्टिंग स्टोरी, दिलीप प्रभावळकरांचा खुलासा, म्हणाले- "तो मंत्र..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 14:41 IST2025-09-12T14:40:35+5:302025-09-12T14:41:14+5:30

Dilip Prabhavalkar : दिलीप प्रभावळकर यांनी मालिका, सिनेमा आणि नाटकांमध्ये काम करून रसिकांच्या मनात घर केले आहे. सध्या ते चर्चेत आले आहेत. नुकताच त्यांचा 'दशावतार' हा चित्रपट प्रदर्शित झाला.

Interesting story behind the dialogue 'Om Phat Swaha' from the movie 'Zapatlela', Dilip Prabhavalkar reveals, said- "That mantra..." | 'झपाटलेला' सिनेमातील 'ओम फट् स्वाहा' डायलॉगमागची इंटरेस्टिंग स्टोरी, दिलीप प्रभावळकरांचा खुलासा, म्हणाले- "तो मंत्र..."

'झपाटलेला' सिनेमातील 'ओम फट् स्वाहा' डायलॉगमागची इंटरेस्टिंग स्टोरी, दिलीप प्रभावळकरांचा खुलासा, म्हणाले- "तो मंत्र..."

दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) हे मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आहेत. मालिका, सिनेमा आणि नाटकांमध्ये काम करून त्यांनी अभिनयाची छाप पाडली. सध्या ते चर्चेत आले आहेत. नुकताच त्यांचा 'दशावतार' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाचं सर्वत्र खूप कौतुक होताना दिसत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलीप प्रभावळकर यांनी   अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. त्यावेळी त्यांनी 'तात्या विंचू' या त्यांच्या गाजलेल्या भूमिकेबद्दल काही मनोरंजक किस्से सांगितले.

दिलीप प्रभावळकर यांनी सांगितले की, 'तात्या विंचू'च्या भूमिकेसाठी त्यांनी खास बेसमध्ये असलेला आवाज वापरला. या भूमिकेसाठी त्यांना सोन्याची कवळी, लेदरचे जॅकेट आणि उभे राहिलेले केस असा खास लूक देण्यात आला होता. चित्रपटात माझी भूमिका लहान होती. यात माझे आणि महेश कोठारे यांचे युद्ध गावातील पोस्ट ऑफिसमध्ये होते, ज्यात मला गोळी लागते आणि मी खाली पडतो. 'कुबड्या मी अमर झालो,' असे मी म्हणताच मला गोळी लागते आणि माझा आत्मा तिथे असलेल्या बाहुल्यात प्रवेश करतो.

'ओम फट स्वाहा' असा झाला प्रसिद्ध
चित्रपटातील बाहुला रामदास पाध्ये यांनी बनवला होता. हा बाहुला दिसायला गोंडस असल्याने तो अधिकच भीतीदायक वाटला. प्रभावळकर यांनी याच गोंडस बाहुल्याला आपला आवाज दिला. 'ओम फट स्वाहा' हा डायलॉग यामुळेच खूप प्रसिद्ध झाला, आणि तो मंत्र स्क्रिप्टमध्येच होता. तात्या विंचूला दिलेल्या बेस आवाजामुळे हे पात्र शेवटपर्यंत प्रेक्षकांच्या लक्षात राहिले. याच कारणामुळे लोक त्या बाहुल्याला प्रचंड घाबरत होते, असे प्रभावळकर सांगतात.

'तात्या विंचू' हे नाव कसे पडले?
'तात्या विंचू' या नावामागे एक खास कथा आहे. दिग्दर्शक महेश कोठारे यांनी 'रेड स्कॉर्पिअन' (Red Scorpion) या इंग्रजी चित्रपटातील 'लाल विंचू' या शब्दावरून प्रेरणा घेऊन 'तात्या विंचू' हे नाव ठेवण्यात आले. त्याच वेळी, त्यांच्या मेकअप मॅनचे नाव 'तात्या' असल्यामुळे, हे नाव अधिक प्रभावी वाटले आणि ते पात्राला दिले गेले. यामुळे या भूमिकेला एक वेगळीच ओळख मिळाली.
 

Web Title: Interesting story behind the dialogue 'Om Phat Swaha' from the movie 'Zapatlela', Dilip Prabhavalkar reveals, said- "That mantra..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.