"वाईट ऑडिशनमधून मला 'सुरभी' मिळाली...", रेणुका शहाणेने सांगितला 'तो' अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 13:49 IST2025-12-05T13:48:29+5:302025-12-05T13:49:06+5:30
Renuka Shahane : अभिनेत्री रेणुका शहाणेने दूरदर्शनवरील 'सुरभी' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या ऑडिशन्स आणि निवडीबद्दल सांगितले.

"वाईट ऑडिशनमधून मला 'सुरभी' मिळाली...", रेणुका शहाणेने सांगितला 'तो' अनुभव
रेणुका शहाणे मराठी-हिंदी मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिला 'हम आपके है कौन' या सिनेमातून चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. नुकताच अभिनेत्रीचा उत्तर हा सिनेमा प्रदर्शित झाला. यात रेणुकाने आईची भूमिका साकारलीय तर अभिनय बेर्डेने मुलाची. या चित्रपटाच्या निमित्ताने रेणुका शहाणे सध्या अनेक ठिकाणी मुलाखती देत आहेत. नुकतेच तिने लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर शोमध्ये मुलाखत दिली. यावेळी अभिनेत्रीने दूरदर्शनवरील 'सुरभी' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या ऑडिशन्स आणि निवडीबद्दल सांगितले.
रेणुका शहाणे म्हणाल्या की, ''सुरभीचं ऑडिशन मी दिलं. त्यात काय ओव्हर कॉन्फिडन्स माझा. ४ पानी बृहदेश्वर मंदिराबद्दल मला त्यांनी लिहून दिलं होतं की हे पाठ करून कॅमेरासमोर बोलायचंय म्हणून. त्या आदल्या दिवशी मला सिद्धार्थ काकने पाठवून दिलं होतं. तर ते मी पाठ केलं आणि मला माझ्या स्मृतीवर पूर्ण विश्वास होता की मी खूप छान पद्धतीने ते करणार आणि त्या वयाच्या आत्मविश्वासाने मी कॅमेरा फेस केला. मी म्हणायला सुरुवात केली आणि खूप छान सुरुवात झाली वगैरे. हसून बिसून चार वाक्य झाले आणि मी सगळं विसरले. पुढची चार पानं मी विसरली. आणि माझं म्हणजे आणि माझं मला हसूच यायला लागलं. कारण माझी एकच रिएक्शन असते. त्यामुळे मला स्वतःच हसू यायला लागलं की किती मूर्ख आहे मी की मला कुठला आत्मविश्वास होता. आणि काय मला काहीच आठवत नाहीये. तर ऑडिशन घेणारे सुनील शानबाग ते थिएटरपासून मी ओळखत होते. त्यामुळे मी खूप कंफर्टेबल होते त्यांच्याबरोबर तर ते म्हणाले नाही नाही बोलत जा स्क्रीप्टमध्ये बघून बोलत जा बोलत जा म्हणून मी थांबवलं नाही ऑडिशन स्क्रीप्टमध्ये बघितलं हसले. ते केलं पूर्ण आणि ते झाल्यावर मी म्हटलं हे काही मला मिळत नाही.''
ती पुढे म्हणाली की, ''सुरभींची गोष्ट आणि सिद्धार्थजींनी पण ती ऑडिशन पाहिली आणि म्हणाले की काय म्हणजे किती चुकतेय ही त्याला दिसायला वगैरे ठीक आहे पण चुकतेय किती ती तर गीता म्हणाली की नाही बघ ती किती चांगली हसतेय. म्हणजे तुझ्या धीरगंभीर स्वभावाला जे आपल्याला एक हवंय एक दुसऱ्या पिढीची एक तुला माहित आहे बॅलन्स आणि वेगळ्या पद्धतीचं एक अप्रोच सूत्रसंचालनासाठी तो तिचा परफेक्ट आहे. हिलाच घेऊया बघ मस्त होईल ते. तर सिद्धार्थ मग म्हणाले. गीताचें ऐकेलं त्यांनी लकीली. आणि म्हणून मला सुरभी मिळालं. म्हणजे वाईट ऑडिशनमधून मला सुरभी मिळाली.''