"मी पूर्णपणे नास्तिक आहे", रेणुका शहाणे स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "देव हा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 16:13 IST2025-04-28T16:12:57+5:302025-04-28T16:13:41+5:30

Renuka Shahane : अभिनेत्री रेणुका शहाणे सध्या चर्चेत आले आहेत. नुकताच त्यांचा देवमाणूस हा सिनेमा रिलीज झाला.

"I am a complete atheist," Renuka Shahane said clearly, "God is..." | "मी पूर्णपणे नास्तिक आहे", रेणुका शहाणे स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "देव हा..."

"मी पूर्णपणे नास्तिक आहे", रेणुका शहाणे स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "देव हा..."

अभिनेत्री रेणुका शहाणे (Renuka Shahane) सध्या चर्चेत आले आहेत. नुकताच त्यांचा देवमाणूस हा सिनेमा रिलीज झाला. या चित्रपटात त्यांच्यासोबत दिग्दर्शक-निर्माते महेश मांजरेकर मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट हिंदी सिनेमा वधचा रिमेक आहे. या सिनेमाच्या प्रमोशन निमित्ताने अभिनेत्रीने अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. यावेळी एका मुलाखतीत अभिनेत्रीने त्या नास्तिक असल्याचे सांगितले.

रेणुका शहाणे यांनी फिव्हर पुणेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी तर पूर्णपणे नास्तिक आहे. म्हणजे पिढ्या न पिढ्या आमच्या नास्तिक आहेत. माझ्या आजीकडेच मी लहानाची मोठी झालेय आणि तिच्याकडे वारकरी संप्रदायाला मानतात. त्यामुळे घरात संत तुकाराम, संत ज्ञानेश्वरांचे फोटो आहेत. सर्वसाधारण सगळीकडे घरात देवांचे फोटो असतात पण आमच्याकडे संतांचे असतात. कारण देव चराचरात आहे..! आपल्यामध्ये, सगळीकडेच देव आहे, कुठली एक जागा नाही अनु, रेणू नाही जिथे देव नाही!त्यामुळे विधी करणं आणि अध्यात्म या मधला जो फरक आहे ना तो म्हणजे मी आणि दाखवण्यासाठी तर मुळीच नाही.

'देवमाणूस' सिनेमाबद्दल

लव फिल्म्सचे सादरीकरण असलेल्या 'देवमाणूस' या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय यांनी केले आहे. या चित्रपटाचे निर्माते लव रंजन आणि अंकुर गर्ग आहेत. महेश मांजरेकर, रेणुका शहाणे यांच्याव्यतिरिक्त सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके, अभिजीत खांडकेकर यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

 

Web Title: "I am a complete atheist," Renuka Shahane said clearly, "God is..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.