हृता दुर्गुळेचं टोपणनाव आहे फारच क्यूट; नवरा प्रतिकने दिलंय तिला हे खास नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 12:02 IST2023-04-07T12:00:37+5:302023-04-07T12:02:35+5:30
Hrutha Durgule: हृताला आता घरात याच नावाने तिला बोलावलं जातं. तुम्हाला माहितीये का तिचं टोपणनाव?

हृता दुर्गुळेचं टोपणनाव आहे फारच क्यूट; नवरा प्रतिकने दिलंय तिला हे खास नाव
अनेक तरुणांची क्रश असलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळ (hruta durgule). उत्तम अभिनयासह सौंदर्यामुळे हृताने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सुरुवात केली. 'फुलपाखरु' या मालिकेपासून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या हृताने मोठ्या पडद्यापर्यंत उडी मारली आहे. लवकरच तिचा सर्किट हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या निमित्ताने तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या वैयक्तिक जीवनाविषयी अनेक खुलासे केले.
अलिकडेच हृताने 'लोकमत फिल्मी'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिचं टोपणनाव सांगितलं. विशेष म्हणजे हृताला हे नाव तिच्या नवऱ्याने दिलं असून तो प्रेमाने तिला याच नावाने हाक मारतो.
अनेकांचं क्रश असलेल्या हृताचं टोपणनाव गोली असं असून प्रतिक तिला प्रेमाने या नावाने बोलावतो. विशेष म्हणजे आता तिच्या घरात याच नावाने तिला बोलावलं जातं. हृताची मुख्य भूमिका असलेला सर्किट हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात तिच्यासोबत अभिनेता वैभव तत्ववादी याने मुख्य भूमिका साकारली आहे.