भर कार्यक्रमात सोनालीने दिलं कुणालला 'या' गोष्टीचं ट्रेनिंग; पाहा अप्सरेच्या नवऱ्याची अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 14:28 IST2022-07-17T14:27:12+5:302022-07-17T14:28:00+5:30

Sonalee kulkarni: अलिकडेच सोनालीच्या 'तमाशा लाईव्ह' या चित्रपटाचा प्रीमिअर सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये सोनालीसह तिचा नवरा कुणालदेखील उपस्थित होता.

how to pose in front of paparazzi sonalee kulkarni giving training to her husband | भर कार्यक्रमात सोनालीने दिलं कुणालला 'या' गोष्टीचं ट्रेनिंग; पाहा अप्सरेच्या नवऱ्याची अवस्था

भर कार्यक्रमात सोनालीने दिलं कुणालला 'या' गोष्टीचं ट्रेनिंग; पाहा अप्सरेच्या नवऱ्याची अवस्था

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी (sonalee kulkarni). उत्तम अभिनय कौशल्य आणि सौंदर्य यांच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ही अभिनेत्री आज अप्सरा म्हणूनही ओळखली जाते. सध्या सोनाली तिच्या तमाशा लाईव्ह या चित्रपटामुळे चर्चेत येत आहे. अलिकडेच तिचा हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने सोनाली अनेक कार्यक्रमाला हजेरी लावत आहे. अशाच एका कार्यक्रमात सोनालीसोबत पती कुणाल बेनोडेकरने हजेरी लावली होती. मात्र,यावेळी कार्यक्रम सोडून सोनाली त्याला एका गोष्टीचं ट्रेनिंग देण्यात बिझी झाल्याचं पाहायला मिळालं.

अलिकडेच सोनालीच्या 'तमाशा लाईव्ह' या चित्रपटाचा प्रीमिअर सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये सोनालीसह तिचा नवरा कुणालदेखील उपस्थित होता. त्यामुळे या जोडीला पाहिल्यावर चाहते आणि प्रसारमाध्यमांचे कॅमेरा दोघांचे फोटो काढण्यासाठी पुढे सरसावले. मात्र, कुणालला या लाइमलाइट आणि झगमगाटाची सवय नसल्यामुळे तो काहीसा बावरुन गेला होता. परंतु, या काळात सोनालीने त्याला छानरित्या सांभाळून घेतलं.

कॅमेरा पाहून गोंधळून गेलेल्या कुणालला सोनालीने फोटोग्राफर्सला कशा प्रकारे पोझ द्यायची हे शिकवलं. विशेष म्हणजे भर कार्यक्रमात नवऱ्याची फजिती होऊ नये म्हणून तिने त्याला काही लहानश्या टिप्स दिल्या. या घटनेचा व्हिडीओ खुद्द सोनालीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

दरम्यान, गेल्या वर्षभरापासून सोनालीचे लागोपाठ अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे ती सातत्याने चर्चेचा विषय ठरत आहे. सोनालीने कुणाल बेनोडेकरसोबत लग्नगाठ बांधली आहे. २ फेब्रुवारी २०२० मध्ये या दोघांनी दुबईमध्ये लग्न केलं.
 

Web Title: how to pose in front of paparazzi sonalee kulkarni giving training to her husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.