Hotness overloaded! ऋतुजा बागवेच्या बोल्ड एक्स्प्रेशन्समुळे नेटकरी सैराट; केल्या जबरदस्त कमेंट्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 14:14 IST2024-03-04T14:13:35+5:302024-03-04T14:14:36+5:30
Rutuja bagwe: गेल्या काही काळात ऋतुजाची लोकप्रियता कमालीची वाढली असून ती सातत्याने चाहत्यांच्या संपर्कात येत आहे.

Hotness overloaded! ऋतुजा बागवेच्या बोल्ड एक्स्प्रेशन्समुळे नेटकरी सैराट; केल्या जबरदस्त कमेंट्स
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे (rutuja bagwe). 'चंद्र आहे साक्षीला', 'नांदा सौख्य भरे' अशा कितीतरी गाजलेल्या मालिकांच्या माध्यमातून ऋतुजाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. विशेष म्हणजे छोटा पडदा गाजवल्यानंतर ऋतुजाने रुपेरी पडद्यावर एन्ट्री घेतली असून लागोपाठ तिचे काही सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यामुळे सध्या ती सातत्याने चर्चेत येत आहे. ऋतुजा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून नुकताच तिने एक फोटो शेअर केला आहे.
ऋतुजा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्याविषयीचे अपडेट चाहत्यांना देत असते. यामध्येच तिने इन्स्टाग्रामवर तिचा लेटेस्ट फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने बोल्ड एक्स्प्रेशन्स दिले असून तिच्या फोटोवर चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.
ऋतुजाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती बेडवर बसली असून तिने साडी नेसली आहे. सोबतच बोल्ड मेकअप करत त्याच पद्धतीचे एक्स्प्रेशन्स दिले आहेत. ज्यामुळे तिचा लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
दरम्यान, ऋतुजाने आपल्या अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. नाटक, मालिका, सिनेमा अशा माध्यमातून ती कायम प्रेक्षकांच्या संपर्कात येत असते. अलिकडेच तिचा लंडन मिसळ या सिनेमात झळकली होती.