"मी कंसातील वाक्य लिहायची आणि तू..."; हेमंत ढोमेची सिद्धार्थ चांदेकरसाठी 'फसक्लास' पोस्ट; म्हणाला-
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 11:21 IST2025-02-09T11:21:12+5:302025-02-09T11:21:51+5:30
हेमंत ढोमेने सिद्धार्थ चांदेकरसाठी लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे. काय म्हणाला हेमंत? (fussclass dabhade)

"मी कंसातील वाक्य लिहायची आणि तू..."; हेमंत ढोमेची सिद्धार्थ चांदेकरसाठी 'फसक्लास' पोस्ट; म्हणाला-
मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार एकमेकांसोबत ऑनस्क्रीन-ऑफस्क्रीन काम करत असले तरीही हे कलाकार प्रत्यक्ष आयुष्यात एकमेकांना खूप जपतात. अगदी सख्ख्या भावंडांसारखे राहतात. मराठी मनोरंजन विश्वातील अशीच कलाकार जोडी म्हणजे हेमंत ढोमे (hemant dhome) आणि सिद्धार्थ चांदेकर (siddharth chandekar). हेमंत-सिद्धार्थने आजवर अनेक सिनेमांसाठी एकत्र काम केलंय. या दोघांचा नुकताच रिलीज झालेला 'फसक्लास दाभाडे' (fussclass dabhade) सिनेमाही चांगलाच चर्चेत आहे. त्यानिमित्ताने हेमंतने सिद्धार्थसाठी पोस्ट लिहिली आहे.
हेमंतची सिद्धार्थसाठी खास पोस्ट
हेमंतने सिद्धार्थसोबत खास फोटो पोस्ट करुन लिहिलंय की, "दोन दोस्तांची हॅट्रिक!!! झिम्मा, झिम्मा २ आणि आता फसक्लास दाभाडे! आधी कबीर आणि आता किरण! माझा फेवरेट किरण दाभाडे… पण कबीर पण बिचारा छान होता… जाऊदे ना तूच माझा फेवरेट! प्रेक्षकांना तू आपलसं केलंस आणि प्रेक्षकांनी तुझ्यावर भरभरून प्रेम केलं! मी कंसातील वाक्य लिहायची आणि तू ती पडद्यावर दाखवायची! असंच काम करत राहू, बाकी काय होतंय की आपोआप! बाकी भेटून, बसून बोलूच! पण आपली हॅट्रिक सेलीब्रेट करूया!"
हेमंत-सिद्धार्थचा फसक्लास दाभाडे सिनेमा
'फसक्लास दाभाडे' सिनेमा पाहायला अनेक ठिकाणी प्रेक्षकांनी सहकुटुंब हजेरी लावली. हेमंत ढोमे दिग्दर्शित 'फसक्लास दाभाडे' सिनेमात सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरीश दुधाडे, उषा नाडकर्णी, राजन भिसे या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. हेमंत-सिद्धार्थचा एकत्र असा हा तीसरा प्रोजेक्ट आहे. दोघांचे तीनही प्रोजेक्ट्स सुपरहिट झाले आहेत. त्यामुळे हेमंत-सिद्धार्थची जोडी लय भारी असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे.