हेमांगीचा हॉट अंदाज; बिकिनी परिधान करुन फोटोसाठी दिल्या भन्नाट पोझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 13:00 IST2023-07-02T13:00:00+5:302023-07-02T13:00:02+5:30

Hemangi kavi: हेमांगी सध्या तिची पावसाळी सुट्टी एन्जॉय करत आहे.

hemangi kavi enjoying vacation with husband actress shared swimming pool photoshoot | हेमांगीचा हॉट अंदाज; बिकिनी परिधान करुन फोटोसाठी दिल्या भन्नाट पोझ

हेमांगीचा हॉट अंदाज; बिकिनी परिधान करुन फोटोसाठी दिल्या भन्नाट पोझ

उत्तम अभिनयासह स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी (hemangi kavi). सध्या हेमांगी तिची पावसाळी सुट्टी एन्जॉय करत आहे. त्यामुळे या व्हेकेशनमधील अनेक फोटो, व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत आहे. यामध्येच तिने सोशल मीडियावर तिचे स्विमिंग पूलमधील काही निवडक फोटो शेअर केले आहे. तिच्या या फोटोंची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली असून तिच्या फोटोवर लाइक आणि कमेंटचा पाऊस पडत आहे.

हेमांगी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांसोबत काही ना काही शेअर करत असते. यात नुकतेच तिने स्विमिंग पूलमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती बिकिनीमध्ये दिसून येत आहे. हेमांगीचा हा हॉट आणि बिनधास्त लूक पाहून नेटकऱ्यांनी त्यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ती Pool राणी - Part 2 सगळ्याचा Sequel (Part) येऊ शकतो मग photos चा का नाही? तुला Sequel चांगलाच धडा!!! आपल्या महाराष्ट्रातलं, आपलं कर्जत! तोच तो, आमचा माणूस'' , असं कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत. हेमांगीने या बिकिनी लूकवर लाल रंगाची डार्क लिपस्टिक लावली आहे. तसंच तिने या फोटोंसाठी वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.

दरम्यान, अनेकांनी तिच्या या फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत. ''Waterproof makeup छान टिकला ग तुझा'', असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर,''एवढा पाऊस का बरं पडतोय'' अशी कमेंट केली आहे.

Web Title: hemangi kavi enjoying vacation with husband actress shared swimming pool photoshoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.