लग्नाला एक महिना होताच मानसी नाईक आणि प्रदीप खरेराने दिली ही गुड न्यूज, म्हणाले - येणार लवकरच..

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2021 04:58 PM2021-03-05T16:58:11+5:302021-03-05T16:58:37+5:30

मानसी आणि प्रदीप एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

The good news given by Mansi Naik and Pradip Kharera a month after the marriage, said - will come soon .. | लग्नाला एक महिना होताच मानसी नाईक आणि प्रदीप खरेराने दिली ही गुड न्यूज, म्हणाले - येणार लवकरच..

लग्नाला एक महिना होताच मानसी नाईक आणि प्रदीप खरेराने दिली ही गुड न्यूज, म्हणाले - येणार लवकरच..

googlenewsNext

मानसी नाईक नुकतीच बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्नबेडीत अडकली आहे. लग्नानंतर ती प्रदीप खरेराच्या गावी फरीदाबादला गेली होती. ते दोघे मुंबईत परतले आहेत. दरम्यान मानसी आणि प्रदीप एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकताच मानसीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून तिने त्या दोघांचा म्युझिक अल्बम भेटीला येत असल्याचे सांगितले आहे.


मानसी नाईकने तिच्या नवीन म्युझिक अल्बम वाटेवरी मोगराचा टीझर शेअर करत लिहिले की, आता आमचे स्वतःचे प्रेम गीत आहे. लवकरच येणार भेटीला.
वाटेवरी मोगरा या म्युझिक अल्बमची निर्मिती सागरीका म्युझिकने केली आहे. हे गाणे वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरसाजात सजले आहे. 
मानसी आणि प्रदीपचे चाहते या गाण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.


मानसीचा नवरा प्रदीप खरेरा हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. त्यासोबतच तो अभिनेता आणि मॉडेल आहे. प्रदीप त्याच्या सोशल मीडियावर नेहमीच त्याचे फोटो पोस्ट करत असतो. तो इन्स्टाग्रामवर नेहमीच सक्रिय असतो. त्याला इन्स्टाग्रामवर पाच लाखांहून अधिक जण फॉलो करतात. प्रदीपच्या लूक्सवर त्याचे चाहते चांगलेच फिदा आहेत.
मानसी ही उत्तम डान्सर असून ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअ‍ॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून तिने आपल्या डान्सचे जलवे दाखवले आहेत. याशिवाय रुपेरी पडद्यावरही मानसीने आपल्या अभिनयाद्वारे रसिकांची मनं जिंकली आहेत.


एकता - एक पॉवर, कुटुंब, तीन बायका फजिती ऐका, जबरदस्त, मर्डर मेस्त्री, ढोलकी, हू तू तू, कोकणस्थ यांसारख्या चित्रपटांमध्ये मानसीने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

Web Title: The good news given by Mansi Naik and Pradip Kharera a month after the marriage, said - will come soon ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.