टाइमपासमधील सोज्वळ प्राजू केतकी माटेगावकरनं शेअर केला ग्लॅमरस फोटो, तिची अदा पाहून फॅन्स फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 23:26 IST2022-01-08T23:15:46+5:302022-01-08T23:26:03+5:30
Ketki Mategaonkar : सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय राहणारी केतकी माटेगावकर तिचे ग्लॅमसर फोटो शेअर करत असते. आता तिने आज शेअर केलेल्या अशाच एका फोटोची चर्चा सुरू आहे. तसेच तिच्या ह्या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

टाइमपासमधील सोज्वळ प्राजू केतकी माटेगावकरनं शेअर केला ग्लॅमरस फोटो, तिची अदा पाहून फॅन्स फिदा
मुंबई - अभिनेत्री, गायिका केतकी माटेगावकर हिने शाळा, टाइमपास यासह विविध चित्रपटातील अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केलेलं आहे. मात्र या चित्रपटांतील भूमिकांमुळे एक सोज्जवळ अभिनेत्री अशीच ओळख तिच्या फॅन्सच्या मनात आहे. मात्र सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय राहणारी केतकी तिचे ग्लॅमसर फोटो शेअर करत असते. आता तिने आज शेअर केलेल्या अशाच एका फोटोची चर्चा सुरू आहे. तसेच तिच्या ह्या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.
केतकी माटेगावकरनं तिच्या फेसबूक पेजवर हा फोटो शेअर केला आहे. ब्लॅक ड्रेसमध्ये या फोटोत केतकी खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोवर फॅन्सकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. आतापर्यंत या फोटोला सुमारे १२ हजार लाईक्स मिळाल्या आहेत. तसेच फॅन्सकडून मिळत असलेल्या प्रतिसादाबाबत केतकीने चाहत्यांचे आभार मानले आहेत.
केतकी माटेगावकर ही सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असून, तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे केतकीचाही बोलबाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. याआधीही विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं. दरम्यान, केतकीने शाळा, टाईमपास, टाईमपास-२, काकस्पर्श, तानी अशा विविध चित्रपटांमधून अभिनय केला आहेत.