"हा रिकामटेकड्या लोकांचा उद्योग..", सचिन पिळगावकरांना ट्रोल करणाऱ्यांना गिरीश ओक स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 16:02 IST2026-02-25T16:01:22+5:302026-02-25T16:02:34+5:30

लोकमत फिल्मीशी संवाद साधताना गिरीश ओक यांनी कलाकारांच्या ऑनलाइन ट्रोलिंगबद्दल भाष्य केलं. यावेळी त्यांनी सचिन पिळगावकरांना ट्रोल करणाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे. 

girish oak on trolling of sachin pilgaonkar said he has been working for years | "हा रिकामटेकड्या लोकांचा उद्योग..", सचिन पिळगावकरांना ट्रोल करणाऱ्यांना गिरीश ओक स्पष्टच बोलले

"हा रिकामटेकड्या लोकांचा उद्योग..", सचिन पिळगावकरांना ट्रोल करणाऱ्यांना गिरीश ओक स्पष्टच बोलले

मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक यांनी अनेक मालिका, सिनेमा आणि नाटकांमधून गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.  अभिनयाबरोबरच गिरीश ओक त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. लोकमत फिल्मीशी संवाद साधताना गिरीश ओक यांनी कलाकारांच्या ऑनलाइन ट्रोलिंगबद्दल भाष्य केलं. यावेळी त्यांनी सचिन पिळगावकरांना ट्रोल करणाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे. 

गिरीश ओक म्हणाले, "कमेंट करणं, ट्रोल करणं हा रिकामटेकड्या लोकांचा उद्योग आहे. ही चेहरा नसलेली माणसं आहेत. त्यांना काही काम नाही म्हणून ते रिअॅक्ट करतात. वाईट कमेंट करणाऱ्या लोकांमुळे एखादा माणूस खूप डिस्टर्बही होऊ शकतो. दोनशे वाईट आणि एखादी चांगली कमेंट असते. आता ज्याप्रकारे सचिन पिळगावकरांबद्दल जे ट्रोलिंग सुरू आहे...काय आहे ते... तो माणूस वयाच्या सातव्या वर्षापासून काम करतोय. त्याच्या आयुष्यात असे अनुभव आलेलेच असणारच. त्याला तुम्ही काय बोलताय....त्याची खरंच ओळख होती.... मीना कुमारीशी, संजीव कुमारशी होती. सगळ्यांशी त्याची ओळख होती. असे अनुभवही आहेत. पण तुम्ही चेष्टाच करायची ठरवली आहे तर वाटेल ते बोलायला लागले आहेत. 

"त्याचं वय, त्याचा अनुभव काहीही न बघता तुम्ही ट्रोलिंग करायला लागता. तुम्हाला एक नागरिक म्हणून काहीच वाटत नाही का? असं कोणी कसं काय करू शकतो? पण या ट्रोल करणाऱ्या लोकांना कळत नाही की खरंच एखादी व्यक्ती जर भावनिक असेल तर काय होऊ शकतं...यांच्या ट्रोलिंगमुळे काहीतरी विचित्रही घडू शकतं", असंही ते पुढे म्हणाले. 

Web Title : सचिन पिलगांवकर को ट्रोल करने वालों पर गिरीश ओक भड़के।

Web Summary : गिरीश ओक ने सचिन पिलगांवकर को निशाना बनाने वाले ऑनलाइन ट्रोलर्स की आलोचना की, उन्हें बेरोजगार बताया। उन्होंने पिलगांवकर के लंबे करियर और अनुभवों पर प्रकाश डाला, ट्रोलर्स की असंवेदनशीलता पर सवाल उठाया और उनकी हरकतों से होने वाले संभावित भावनात्मक नुकसान की चेतावनी दी।

Web Title : Girish Oak slams trolls for targeting Sachin Pilgaonkar online.

Web Summary : Girish Oak criticized online trolls targeting Sachin Pilgaonkar, labeling them as jobless individuals. He highlighted Pilgaonkar's extensive career and experiences, questioning the insensitivity of the trolls and warning of the potential emotional harm caused by their actions.