आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 10:53 IST2025-11-04T10:52:30+5:302025-11-04T10:53:34+5:30

जिनिलिया, रितेश आणि दोन्ही मुलं नुकतेच मुंबई विमानतळावर दिसले. त्यांचा मोठा मुलगा रियान जो फक्त १० वर्षांचा आहे. आई वडिलांशिवाय तो पहिल्यांदाच विमान प्रवासाला निघाला आहे.

genelia deshmukh shared video as she sees off her son riaan first flight without parents | आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...

आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख या मराठमोळ्या कपलची नेहमीच चर्चा असते. महाराष्ट्राचे लाडके दादा वहिनी असं लोक त्यांना प्रेमाने ओळखतात. त्यांना दोन मुलं आहेत. मुलांसोबतचे एन्ज़य करतानाचे अनेक क्षण ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांचा मोठा मुलगा रियान पहिल्यांदाच आई वडिलांशिवाय विमान प्रवास करत आहे. रियानसाठी जिनिलियाने पोस्ट लिहिली आहे.

जिनिलिया, रितेश आणि दोन्ही मुलं नुकतेच मुंबई विमानतळावर दिसले. त्यांचा मोठा मुलगा रियान जो फक्त १० वर्षांचा आहे. आई वडिलांशिवाय तो पहिल्यांदाच विमान प्रवासाला निघाला आहे. त्यालाच निरोप देण्यासाठी सगळे विमानतळावर आले होते. रियान यावेळी स्पोर्ट्स लूकमध्ये दिसत होता. छोटी ट्रॉली बॅग आणि सॅक घेऊन तो निघाला. त्याच्यासोबत शाळेतले इतर मित्रमैत्रिणीही दिसत आहेत. ही त्याची पहिली शाळेची सहल असल्याचं दिसत आहे. जिनिलियाने त्याचा व्हिडिओ शेअर करत लिहिले, "आमच्याशिवाय पहिलीच फ्लाईट...यापूर्वी तुझं प्रत्येक पहिलं पाऊल आमच्यासोबत होतं. पण आता हळूहळू आमच्याशिवाय पहिलं पाऊल तू टाकत आहेस...जा बेटा मस्त जग, मोठा हो आणि आयुष्याचा अनुभव घे. आई, बाबा, राहील आणि फ्लॅश कायम तुझी घरी वाट पाहू."

जिनिलिया मुलाला पहिल्यांदाच एकट्याने विमानात सोडताना भावुक झालेली दिसत आहे. मात्र आपला मुलगा आता मोठा होतोय याचा आनंदही तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे. तर रियानमध्येही आत्मविश्वास पाहायला मिळत आहे.

दुसरीकडे जिनिलिया आता पुन्हा सिनेमांमध्ये सक्रीय झाली आहे. आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'मध्ये ती दिसली. तसंच तिचा 'ज्युनिअर' हा तेलुगु सिनेमाही काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला. लवकरच ती इम्रान हाश्मीसोबत 'गनमास्टर जी९'मध्ये दिसणार आहे. पुढील वर्षी हा सिनेमा रिलीज होणार आहे. 

Web Title : जेनेलिया देशमुख ने बेटे की पहली सोलो फ्लाइट का वीडियो शेयर किया।

Web Summary : जेनेलिया देशमुख ने अपने बेटे रियान की पहली सोलो फ्लाइट का वीडियो शेयर किया। उन्होंने अपनी भावनाएं व्यक्त करते हुए कहा कि वह अब स्वतंत्र हो रहा है और उसे दुनिया का अनुभव लेने की शुभकामनाएं दीं। जेनेलिया और रितेश उसे विदा करने के लिए एयरपोर्ट पर थे।

Web Title : Genelia Deshmukh shares son's first solo flight video, expresses emotions.

Web Summary : Genelia Deshmukh shared a video of her son, Riaan, embarking on his first solo flight. She expressed her emotions, noting his growing independence and wishing him well as he experiences the world. Genelia and Riteish were at the airport to see him off.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.