"...पण दुर्दैवाने आईनेच मनापासून प्रेम केलं" अखेर गश्मीरने व्यक्त केली वडिलांबाबत नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 10:43 IST2023-08-28T10:42:08+5:302023-08-28T10:43:03+5:30

आईवडिलांच्या नात्याबाबतीत गश्मीरने केला खुलासा

gashmeer mahajani shows displeasure for his father as her mother only wholeheartedly loved her hudband | "...पण दुर्दैवाने आईनेच मनापासून प्रेम केलं" अखेर गश्मीरने व्यक्त केली वडिलांबाबत नाराजी

"...पण दुर्दैवाने आईनेच मनापासून प्रेम केलं" अखेर गश्मीरने व्यक्त केली वडिलांबाबत नाराजी

मराठी तसंच हिंदी सिनेसृष्टी गाजवणारे हँडसम अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचं १५ जुलै रोजी निधन झालं. ते तळेगाव येथे एकटेच राहत होते तसंच त्यांचा मृत्यू झाल्यांचं दोन दिवस कोणालाच कळलं नव्हतं. या दिग्गज कलाकाराचा अशा प्रकारे मृत्यू येणं खूपच दुर्दैवी होतं. यामुळे सर्वच चाहते हळहळले. यानंतर मुलगा गश्मीर महाजनीवर (Gashmeer Mahajani) प्रचंड टीका करण्यात आली. आता गश्मीर हळूहळू चाहत्यांच्या प्रश्नांना सामोरा जात आहे.

दुर्दैवाने आईचंच जास्त प्रेम होतं 

रवींद्र महाजनी यांची बायको माधवी महाजनी. रवींद्र महाजनींच्या निधनानंतर माधवी यांची तब्येत खराब झाली. गश्मीर आईला सावरताना दिसला. पतीच्या निधनामुळे त्या प्रचंड धकक्यात गेल्या होत्या. रवींद्र महाजनी कुटुंबापासून दूरच राहायचे. यामुळे गश्मीर आपसूकच आईच्या जास्त जवळ होता. नुकतंच गश्मीरने इन्स्टाग्रामवर आस्क गश्मीर हे सेशन घेत चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. 'सर तुमच्या आईवडिलांचं लव्ह मॅरेज होतं की अरेंज? मधू मॅडम सारख्या एवढ्या छान व्यक्ती रवींद्र सरांच्या आयुष्यात कशा आल्या?' असा प्रश्न एका चाहत्याने विचारला. यावर गश्मीर उदास होत म्हणाला, 'लव्ह मॅरेज...पण दुर्दैवाने अगदी मनापासूनच प्रेम फक्त तिनेच केलं.'

रवींद्र महाजनी हे बऱ्याच काळापासून वेगळेच राहायचे. तळेगाव जवळील आंबी गावात एक भाड्याच्या फ्लॅटमध्ये ते राहत होते. तर गश्मीर आई आणि पत्नी, मुलांसोबत मुंबईत राहतो. नजीकच्या काळात गश्मीरच्या अनेक फोटोंमध्ये त्याचे वडील कुठेच दिसत नव्हते. फक्त आईच सगळ्या फोटोंमध्ये दिसायची. गश्मीरला एक बहीणही आहे. सध्या तो आपल्या कुटुंबाची विशेषत: आईची काळजी घेत आहे. त्याची आई हळूहळू धक्क्यातून सावरत आहे. लवकरच गश्मीर कामावर परतेल असंही त्याने चाहत्यांना सांगितलं . 

Web Title: gashmeer mahajani shows displeasure for his father as her mother only wholeheartedly loved her hudband