Dashavatar: 'दशावतार' चित्रपट पाहिल्यानंतर गश्मीर महाजनीने दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 09:17 IST2025-09-16T08:59:28+5:302025-09-16T09:17:20+5:30

'दशावतार' पाहिल्यानंतर गश्मीरने एका वाक्यात दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

Gashmeer Mahajani Reviews Dashavatar Marathi Movie | Dashavatar: 'दशावतार' चित्रपट पाहिल्यानंतर गश्मीर महाजनीने दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

Dashavatar: 'दशावतार' चित्रपट पाहिल्यानंतर गश्मीर महाजनीने दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

Gashmeer Mahajani On Dashavatar Film : दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेला 'दशावतार' सिनेमा १२ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय. 'दशावतार' सिनेमातून कोकणातील परंपरा आणि संस्कृतीचं दर्शन घडवण्यासोबतच दशावतार सादर करणाऱ्या एका कलाकाराची कहाणी उत्तमरित्या गुंफवून दाखवण्यात आली आहे. दिलीप प्रभावळकर यांच्यासह  इतर कलाकारांच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. अभिनेता गश्मीर महाजनीने हा चित्रपट पाहिला असून त्यानं चित्रपटाविषयी खास प्रतिक्रिया दिली आहे. 

'दशावतार' या चित्रपटातून हाताळण्यात आलेल्या मुद्द्याचीही सध्या चर्चा आहे. हा सिनेमा पाहून गश्मीर महाजनीदेखील भारावून गेला आहे.  गश्मीरने दशावतार चित्रपट पाहिल्यानंतर त्याच्या भावना एका वाक्यात  व्यक्त केल्या. अभिनेत्याने सोशल मीडियावर दशावतार चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केलं. त्यासोबत कॅप्शनमध्ये गश्मीरनं लिहले, "आज चित्रपटगृहात जाऊन एक चांगला चित्रपट पाहिला". तसेच पुढे हार्ट इमोजी देखील शेअर केली आहे. 

'दशावतार'ची कमाई किती? (Dashavatar Box Office Collection) 

'दशावतार' चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांच्यासह जोडीला सुनील तावडे, महेश मांजरेकर, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदलकर, भरत जाधव, रवी काळे, विजय केंकरे, आरती वाडगबाळकर या सगळ्यांनीच त्यांच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या चित्रपटाची क्रेझ सर्वत्र पाहायला मिळते आहे. तीन दिवसांत दशावतारने ४.३७ कोटींचा व्यवसाय केला. त्यात आता चित्रपटाच्या चौथ्या दिवसाची आकडेवारी समोर आली आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी चित्रपटाने १.१६ कोटी इतकी कमाई केली आहे. त्यामुळे आता चित्रपटाचं एकूण कलेक्शन ५.८५ कोटी इतकी झालं आहे.
 

Web Title: Gashmeer Mahajani Reviews Dashavatar Marathi Movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.