अखेर शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे अडकले लग्नबेडीत, या ठिकाणी पार पडला विवाह सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 14:04 IST2024-02-01T14:03:53+5:302024-02-01T14:04:25+5:30
Shivani Surve And Ajinkya Nanaware Wedding : अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांनी आज गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. नुकतेच त्यांच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले आहेत. त्यानंतर त्यांनी लग्न केल्याचे समोर आले आहे.

अखेर शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे अडकले लग्नबेडीत, या ठिकाणी पार पडला विवाह सोहळा
राठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल्सपैकी एक कपल म्हणजे शिवानी सुर्वे (Shivani Surve) आणि अजिंक्य ननावरे (Ajinkya Nanaware). ते दोघे सध्या चर्चेत आले आहेत. त्यांनी ३१ जानेवारी, २०२४ रोजी गुपचूप साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. त्यांच्यावर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. दरम्यान आज म्हणजेच १ फेब्रुवारी रोजी शिवानी आणि अजिंक्य लग्नबेडीत अडकले आहेत. त्यांचा विवाहसोहळा ठाणे येथील येऊरमधील एक्झॉटिका द ट्रॉपिकल रिट्रीट या रिसॉर्टमध्ये पार पडला आहे. अद्याप त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आलेले नाहीत.
शिवानी आणि अजिंक्य काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा दोघेही फिरायला जातात गेला तिथले रोमँटिक फोटो शेअर करत असतात. दरम्यान आता त्या दोघांनी लग्न केल्याचे समोर आले. ठाण्यातील येऊरमधील एका रिसॉर्टमध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नाला बिग बॉस मराठीमधील कलाकारांनी हजेरी लावली आहे. काल त्यांचा हळदीचा कार्यक्रम पार पडला. त्या दरम्यान काही कलाकारांनी धमलामस्ती करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.
शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरेची लव्हस्टोरी खूपच हटके आहे. तू जीवाला गुंतवावे या मालिकेत काम करत असताना त्यांची मैत्री झाली. मालिका संपल्यानंतर त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. २०१५-१६ च्या दरम्यान त्यांच्या रिलेशनशिपला सुरूवात झाली. त्यानंतर वर्षभराने म्हणजेच साधारण २०१७ मध्ये त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल घरी सांगितले. मात्र दोघांच्या घरातून नात्याला ठळक विरोध झाला होता. त्यांच्या घरच्यांनी दोघांना एकत्र राहून दाखवा असं सांगितले.
४ वर्षांनंतर घरच्यांनी स्वीकारलं त्यांचं नातं
शिवानी आणि अजिंक्य एकत्र राहू लागले. लॉकडाऊन सुरू झाल्यावर त्यांच्या घरच्यांना त्यांच्या नात्यावर विश्वास बसला आणि ४ वर्षांनंतर त्यांच्या घरच्यांनी या नात्याला परवानगी दिली. ३१ जानेवारीला साखरपुडा आणि १ फेब्रुवारीला त्यांनी लग्न केले.