"आयुष्यातलं सगळं काही संपलंय...", कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गौतमीची अशी झाली होती अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 16:47 IST2023-09-23T16:47:03+5:302023-09-23T16:47:28+5:30
Gautami Patil : काही महिन्यांपूर्वी गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहून तिला खूप मोठा धक्का बसला होता.

"आयुष्यातलं सगळं काही संपलंय...", कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गौतमीची अशी झाली होती अवस्था
सोशल मीडिया सेन्सेशन गौतमी पाटील (Gautami Patil) गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लवकरच तिची मुख्य भूमिका असलेला घुंगरू हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच एका मुलाखतीत तिने बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. काही महिन्यांपूर्वी गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहून तिला खूप मोठा धक्का बसला होता. आता आपल्या आयुष्यातलं सगळं काही संपलंय, आपण इथेच थांबायला हवं, असं तिला वाटू लागलं होतं, असे तिने या मुलाखतीत सांगितले.
गौतमी पाटीलने एबीपी माझाच्या माझा कट्टावर सांगितले की, मी घरी होते तेव्हा हा व्हिडीओ पाहून मला खूप मोठा धक्का बसला होता. आता सगळं काही संपलंय आता आपण इथेच थांबायला हवं असा विचार मनात येऊ लागला. पण चाहत्यांनी आणि विशेष करून महिलांनी मला पाठिंबा दिला. त्यांच्या पाठिंब्यामुळे मी पुन्हा खंबीर झाले. लोकांनी मला सांभाळून घेतले त्यांचे मी आभार मानते.
मी खूप गरीब घरातली मुलगी आहे
गौतमी पुढे म्हणाली की, मी खूप गरीब घरातली मुलगी आहे. माझ्या मागे कोणीही गॉडफादर नाही. मला कोणाचाही पाठिंबा नाही. त्यामुळे माझ्यावर सतत टीका होत असते. ज्यावेळी माझ्याकडून चूक झाली तेव्हा मी सगळ्यांची माफी देखील मागितली होती. पण आता मी सगळे सुरळीत करते तरीही लोक टीका करत आहेत. जे टीका करतात ते मोठे लोक आहेत. मला हे राजकारण अजिबात कळत नाही. आयोजक जसे सांगतील तसे मी करत असते.
...म्हणून लोक टीका करत आहेत
माझ्यासारखे कलाकार खूप पुढे गेले त्यांना चित्रपटातून काम करण्याची संधी मिळाली. त्यांना अशा टीकेला कधीच सामोरे जावे लागले नाही. आपण पुढे चाललो म्हणून लोक टीका करत आहेत असे मला वाटते. म्हणून सतत वाटत राहतं की आपल्या मागे कोणाचाच पाठिंबा नाही, आणि कोणाचा हात देखील नाही, असे गौतमी म्हणते.