फोटोतील 'या' चिमुकल्याला ओळखलं का? सध्या सई ताम्हणकरमुळे येतोय चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 16:08 IST2022-04-07T16:07:07+5:302022-04-07T16:08:15+5:30
अलिकडेच एका मराठी कलाविश्वातील सिनेनिर्मात्याने त्याच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे.

फोटोतील 'या' चिमुकल्याला ओळखलं का? सध्या सई ताम्हणकरमुळे येतोय चर्चेत
प्रत्येकाकडे जुन्या आठवणींचा एक कप्पा असतो आणि यात असंख्य आठवणी दडवून ठेवलेल्या असतात. असेच आठवणींचे कप्पे सेलिब्रिटींकडेही पाहायला मिळतं. त्यामुळे अनेकदा ही कलाकार मंडळी त्यांच्या जुन्या आठवणी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यात अलिकडेच एका मराठी कलाविश्वातील सिनेनिर्मात्याने त्याच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे हा सिनेनिर्माता सध्या अभिनेत्री सई ताम्हणकरमुळे चर्चेत येत आहे.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये एक लहान मुलगा त्याच्या आईच्या कडेवर बसल्याचं दिसून येत आहे. यावेळी त्याची आई आपल्या बाळाला कुशीत घेऊन प्रचंड आनंदात आहे. तर हा चिमुकला मुलगाही आपल्या आईला सोडण्यास तयार नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या मायलेकाचा फोटो विशेष चर्चिला जात आहे.
या फोटोमध्ये दिसणारा हा चिमुकला म्हणजे सिनेनिर्माता अनिश जोग आहे. अनिश मराठी कलाविश्वातील लोकप्रिय निर्माता असून त्याने अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. 'आणि काय हवं?', 'गर्लफ्रेंड', 'मुरांबा', 'वायझेड', 'डबल सीट', 'टाईम प्लीज' आणि 'धुरळा' या काही चित्रपट आणि वेबसीरिजची निर्मिती केली आहे.
सई ताम्हणकरशी काय आहे अनिशसोबत कनेक्शन?
काही दिवसांपूर्वी सईने इन्स्टाग्रामवर अनिशचा एक फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करत तिने सई माझ्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर तेज येतं, असं कॅप्शन दिलं होतं. हे कॅप्शन वाचल्यावर अनेकांनी सईचं अभिनंदन केलं आहे. तसंच सई अनिशला डेट करतीये की काय? असा प्रश्न चाहते विचारत आहेत. मात्र, या प्रश्नाचं उत्तर अद्यापही गुलदस्त्यात असून त्यावर सई आणि अनिशने मौन बाळगलं आहे.