केसांच्याआड चेहरा लपवलेल्या अभिनेत्रीला ओळखलं का?; 'झिम्मा 2' मध्ये केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 15:14 IST2024-01-08T15:10:42+5:302024-01-08T15:14:18+5:30

Marathi actress: ही अभिनेत्री कोण असेल असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

Do you recognize the actress who hides her face behind her hair | केसांच्याआड चेहरा लपवलेल्या अभिनेत्रीला ओळखलं का?; 'झिम्मा 2' मध्ये केलंय काम

केसांच्याआड चेहरा लपवलेल्या अभिनेत्रीला ओळखलं का?; 'झिम्मा 2' मध्ये केलंय काम

सध्याच्या काळात प्रत्येक जण सोशल मीडियाचा वापर करतो. यात खासकरुन सेलिब्रिटी, अनेक दिग्गज लोक या माध्यमाचा प्रभावीपणे वापर करतात. विशेष म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार आणि चाहते थेट एकमेकांशी जोडले जातात. त्यामुळे ही कलाकार मंडळी सुद्धा त्यांच्या जीवनातील लहान-मोठे किस्से चाहत्यांसोबत शेअर करत असतात. सध्या सोशल मीडियावर एका मराठमोळ्या अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये वाऱ्याची झुळूक आल्यामुळे या अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर केस आले आहेत. त्यामुळे तिचा चेहरा नीट दिसत नाही. म्हणूनच ही अभिनेत्री नेमकी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. परंतु, हा फोटो नीट पाहिला तर केसांच्या मागे चेहरा लपवणारी अभिनेत्री कोण आहे हे लक्षात येतं.  

दरम्यान, फोटोमध्ये दिसणाऱ्या या अभिनेत्रीने चेक्सचा शर्ट आणि ब्लॅक कलरची जीन्स परिधान केली आहे. तसंच तिने या फोटोव्यतिरिक्त अनेक वेगवेगळ्या पोझमधले फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये दिसणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री रिंकू राजगुरु आहे. रिंकू सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे कायम तिचे नवनवीन फोटो, व्हिडीओ ती नेटकऱ्यांसोबत शेअर करत असते. रिंकूने सैराट या सिनेमातून मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यानंतर 'मेकअप', 'कागर', 'आठवा रंग प्रेमाचा', 'झिम्मा 2' अशा कितीतरी सिनेमात ती झळकली.
 

Web Title: Do you recognize the actress who hides her face behind her hair