फक्त १ रुपया मानधनात लक्ष्मीकांत बेर्डेंनी केला 'धुमधडाका', महेश कोठारेंनी सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 11:48 IST2026-02-18T11:47:13+5:302026-02-18T11:48:43+5:30

Laxmikant Berde: लक्ष्मीकांत-महेश कोठारे यांचा धुमधडाका हा सिनेमा त्याकाळी प्रचंड गाजला. आजही या सिनेमाची क्रेझ जराही कमी झालेली नाही.

director-mahesh-kothare-signed-laxmikant-berde-by-paying-just-1-rupee | फक्त १ रुपया मानधनात लक्ष्मीकांत बेर्डेंनी केला 'धुमधडाका', महेश कोठारेंनी सांगितला किस्सा

फक्त १ रुपया मानधनात लक्ष्मीकांत बेर्डेंनी केला 'धुमधडाका', महेश कोठारेंनी सांगितला किस्सा

मराठी कलाविश्वात तुफान गाजलेला सिनेमा म्हणजे धुमधडाका. महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde), अशोक सराफ (ashok saraf), निवेदिता सराफ (nivedita saraf), जयराम कुलकर्णी (jayram kulkarni) असे दिग्गज कलाकार असलेला हा सिनेमा त्याकाळी तुफान गाजला. इतकंच नाही तर आजही या सिनेमाची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. या सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले होते. विशेष म्हणजे सुपरहिट ठरलेल्या या सिनेमासाठी लक्ष्मीकांत यांनी फक्त १ रुपया मानधन घेतलं होतं. एका मुलाखतीमध्ये अभिनेता, दिग्दर्शक महेश कोठारे यांनी या गोष्टीचा खुलासा केला आहे.

महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. विशेष म्हणजे त्यांच्या जोडीला प्रेक्षकांनीही तितकंच भरभरुन प्रेम दिलं. त्यातलाच एक सिनेमा म्हणजे १९८५ साली प्रदर्शित झालेला 'धुमधडाका'. या सिनेमासाठी महेश यांनी फक्त १ रुपया मानधन देत लक्ष्मीकांत यांना साईन केलं होतं.

''धुमधडाका’ हा सिनेमा ‘प्यार किए जा’ या हिंदी सिनेमाचा मराठी रीमेक होता. हा सिनेमा मराठी छान होईल असं मला वाटलं होतं. या सिनेमातील मेहमूद यांची भूमिका मला प्रचंड आवडली होती. त्यामुळे या भूमिकेसाठी मी एका चांगल्या मराठी कलाकाराच्या शोधात होतो. पण, नेमकं कोणाला घ्यावं हे समजत नव्हतं. किशोर कुमार यांच्या भूमिकेसाठी मी अशोक सराफला फायनल केलं होतं. तर शशी कपूर यांची भूमिका मी स्वत: करणार होतो. पण, मेहमूद यांच्या भूमिकेसाठी मला योग्य कलाकार मिळत नव्हता", असं महेश कोठारे म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "त्यावेळी 'झोपी गेलेला जागा झाला' हे नाटक खूप गाजलं होतं. या नाटकाचे अनेक प्रयोगही झाले होते. परंतु, बबन प्रभू यांच्या मृत्युनंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हे नाटक पुन्हा रंगमंचावर आणायचं असा निर्णय नाटकाच्या टीमने घेतला. त्यावेळी बबन प्रभू यांच्या भूमिकेसाठी एका नवीन अभिनेत्याची निवड झाली होती. तो अभिनेता म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. मी त्या नाटकामध्ये लक्ष्याला पाहिलं आणि मी एकदम इंप्रेस झालो. माझ्या सिनेमात मेहमूद यांच्या भूमिकेसाठी याचीच निवड करणार हे मी पक्कं ठरवलं."

'धुमधडाका'साठी लक्ष्मीकांत यांनी घेतलं १ रुपया मानधन

लक्ष्मीकांतचा अभिनय पाहिल्यानंतर मी त्याची भेट घेतली आणि माझ्या मनातली धुमधडाकाची इच्छा सांगितलं. विशेष म्हणजे कोणताही विचार न करता तो लगेच तयार झाला. त्यावेळी अगदी १ रुपया सायनिंग अमाउट घेऊन लक्ष्मीकांतने हा सिनेमा साईन केला. 

दरम्यान, लक्ष्मीकांत-महेश कोठारे यांचा धुमधडाका हा सिनेमा त्याकाळी प्रचंड गाजला. आजही या सिनेमाची क्रेझ जराही कमी झालेली नाही. लक्ष्मीकांत आणि महेश या जोडीने अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. विशेष म्हणजे ते सगळेच सिनेमा सुपरहिट ठरले.

Web Title : लक्ष्मीकांत बेर्डे की 'धूम धड़ाका' के लिए ₹1: महेश कोठारे की कहानी

Web Summary : लक्ष्मीकांत बेर्डे ने हिट फिल्म 'धूम धड़ाका' में सिर्फ ₹1 में अभिनय किया। निर्देशक महेश कोठारे ने बताया कि बेर्डे तुरंत सहमत हो गए, वे उनके मंच प्रदर्शन से प्रभावित थे। यह फिल्म एक बड़ी सफलता बन गई।

Web Title : Laxmikant Berde's 'Dhoom Dhadaka' for ₹1: Mahesh Kothare's Story

Web Summary : Laxmikant Berde starred in the hit film 'Dhoom Dhadaka' for just ₹1. Director Mahesh Kothare revealed Berde's immediate agreement, impressed by his stage performance. The movie, a remake, became a massive success, solidifying their partnership.