"तुमच्या नखा इतकीही सर मला नाही..."; केदार शिंदेंनी आजोबा शाहीर साबळेंच्या जन्मदिनी लिहिली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 11:01 IST2025-09-03T11:00:11+5:302025-09-03T11:01:20+5:30

अभिनेते केदार शिंदेंनी आजोबा शाहिर साबळेंच्या जन्मदिनी लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे

director Kedar Shinde wrote a special post on the birthday of his grandfather Shahir Sable | "तुमच्या नखा इतकीही सर मला नाही..."; केदार शिंदेंनी आजोबा शाहीर साबळेंच्या जन्मदिनी लिहिली खास पोस्ट

"तुमच्या नखा इतकीही सर मला नाही..."; केदार शिंदेंनी आजोबा शाहीर साबळेंच्या जन्मदिनी लिहिली खास पोस्ट

आज शाहीर साबळे यांचा जन्मदिन. शाहीर साबळेंनी लिहिलेली आणि गायलेली गाणी आजही मराठी माणसाच्या नसानसांत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घुमत आहेत. शाहीर साबळेंचा नातू म्हणजेच केदार शिंदे हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक. केदार शिंदे कायमच आजोबांबद्दलची आठवण सोशल मीडियावर जागवताना दिसतात. केदार यांनी आज आजोबांच्या जन्मदिनानिमित्त लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे.

केदार शिंदेंनी लिहिली खास पोस्ट 

केदार शिंदेंनी आजोबांचा खास फोटो पोस्ट करुन लिहिलंय की, ''बाबा.... महाराष्ट्र शाहीर.. आज ३ सप्टेंबर, तुमचा जन्मदिन. माझ्यासाठी तुम्ही कायम आहात. एक कलाकार म्हणून तुमचं योगदान उच्च कोटीचं आहे. पद्मश्री म्हणून सन्मानित होणारे तुम्ही लोककलावंत. माझ्यासाठी लहानपणापासूनचे आयडॉल. तुमच्या नखा इतकीही सर मला नाही. मात्र पहाडाकडे पाहूनच प्रवास सुरू केला. आज जो मी आहे त्या कलात्मक संस्कारांसाठी मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.'' केदार यांनी लिहिलेल्या पोस्टवर अनेकांनी शाहिर साबळेंना आदरांजली वाहिली आहे.


केदार शिंदेंनी आजोबांच्या कार्यावर आधारीत 'महाराष्ट्र शाहीर' हा सिनेमा बनवला होता. या सिनेमाचं दिग्दर्शन केदार शिंदेंनी केलं होतं. सिनेमात अंकुश चौधरीने शाहिर साबळेंची प्रमुख भूमिका साकारली होती. याच सिनेमाच्या माध्यमातून केदार शिंदेंची लेक सनाने सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. सिनेमाचं संगीत अजय - अतुल यांनी केलं होतं. सिनेमाला बॉक्स ऑफिस संमिश्र प्रतिसाद मिळाला.  परंतु आजोबांची गाथा मोठ्या पडद्यावर साकार झाल्याने केदार शिंदे समाधानी होते.

Web Title: director Kedar Shinde wrote a special post on the birthday of his grandfather Shahir Sable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.