'दशावतार' पाहायचा राहून गेला? आता घरबसल्या टीव्हीवर पाहा, कधी आणि कुठे? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 16:16 IST2025-12-10T16:15:46+5:302025-12-10T16:16:11+5:30
थिएटर गाजवलेला 'दशावतार' ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला होता. आता 'दशावतार' टीव्हीवर घरबसल्या पाहता येणार आहे.

'दशावतार' पाहायचा राहून गेला? आता घरबसल्या टीव्हीवर पाहा, कधी आणि कुठे? जाणून घ्या
सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या 'दशावतार' सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. बऱ्याच काळानंतर मराठी सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहात गर्दी करत होते. कोकणातील परंपरा आणि दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाने नटलेला 'दशावतार' प्रेक्षकांना भावला होता. थिएटर गाजवलेला 'दशावतार' ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला होता. आता 'दशावतार' टीव्हीवर घरबसल्या पाहता येणार आहे.
'दशावतार' सिनेमा थिएटरमध्ये पाहायचा राहून गेला असेल तर तुम्हाला काळजी करण्याचं काहीच कारण नाही. कारण आता या गाजलेल्या मराठी सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर येणार आहे. लवकरच 'दशावतार' टीव्हीवर लागणार आहे. २१ डिसेंबर रोजी झी मराठी वाहिनीवर 'दशावतार' सिनेमा दाखवला जाणार आहे. संध्याकाळी ७ वाजता 'दशावतार' झी मराठीवर लागणार आहे. झी मराठीच्या ऑफिशियल सोशल मीडियावरून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
'दशावतार' सिनेमात दिलीप प्रभावळकर मुख्य भूमिकेत आहेत. तर त्यांच्या लेकाची भूमिका सिद्धार्थ मेनन याने साकारली आहे. भरत जाधव, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डे, महेश मांजरेकर, सुनिल तावडे, विजय केंकरे अशी या सिनेमाची स्टारकास्ट आहे. सुबोध खानोलकर यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली होती.