थिएटर गाजवलेला 'दशावतार' आता ओटीटीवर येणार! कधी आणि कुठे? लगेच जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 17:35 IST2025-11-07T17:34:12+5:302025-11-07T17:35:33+5:30
थिएटर गाजवलेला 'दशावतार' ओटीटीवर रिलीज होणार आहे. 'दशावतार'च्या ओटीटी रिलीजबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

थिएटर गाजवलेला 'दशावतार' आता ओटीटीवर येणार! कधी आणि कुठे? लगेच जाणून घ्या
अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'दशावतार' सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. कोकणातील परंपरा आणि दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाने नटलेला 'दशावतार' सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकही चित्रपटगृहात गर्दी करत होते. सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं होतं. आता थिएटर गाजवलेला 'दशावतार' ओटीटीवर रिलीज होणार आहे. 'दशावतार'च्या ओटीटी रिलीजबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
'दशावतार' सिनेमाने थिएटर हाऊसफूल केले होते. पण, ज्यांना हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहणं शक्य झालं नाही ते 'दशावतार'च्या ओटीटी रिलीजची वाट बघत होते. आता त्या प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे. कारण 'दशावतार' सिनेमा अवघ्या काही दिवसांतच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. झी५ या ओटीटी अॅपवर 'दशावतार' सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. "२०२५ या वर्षातला सुपरहिट भव्य दिव्य सिनेमा ‘दशावतार’१४ नोव्हेंबर पासून फक्त आपल्या मराठी ZEE5 वर...!", असं म्हणत झीकडून याबाबत पोस्टद्वारे माहिती देण्यात आली आहे.
'दशावतार' सिनेमात दिलीप प्रभावळकर मुख्य भूमिकेत आहेत. तर त्यांच्या लेकाची भूमिका सिद्धार्थ मेनन याने साकारली आहे. भरत जाधव, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डे, महेश मांजरेकर, सुनिल तावडे, विजय केंकरे अशी या सिनेमाची स्टारकास्ट आहे. सुबोध खानोलकर यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.