निळू फुले यांच्या जावयाला पाहिलंत का? मुलगी आणि जावई करताहेत एकाच मालिकेत काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 10:56 IST2024-04-02T10:55:25+5:302024-04-02T10:56:25+5:30
Nilu Phule : सर्वांना माहित आहे की, निळू फुले यांची मुलगी गार्गी हीदेखील अभिनेत्री आहे. मात्र आता त्यांच्या जावयाची छोट्या पडद्यावर एन्ट्री झाली आहे.

निळू फुले यांच्या जावयाला पाहिलंत का? मुलगी आणि जावई करताहेत एकाच मालिकेत काम
भारदस्त आवाजामुळे अनेकांच्या मनात भीती निर्माण करणारे अभिनेते म्हणजे निळू फुले (Nilu Phule). निळू फुले यांनी संपूर्ण कलाविश्व गाजवली. मराठी म्हणू नका की बॉलिवूड प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्यांच्या अभिनयाचा डंका वाजवला. आजही लोक त्यांचे सिनेमे तितक्याच आवडीने पाहतात. आजही त्यांचे चाहते त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात. सर्वांना माहित आहे की, निळू फुले यांची मुलगी गार्गी (Gargi Phule) हीदेखील अभिनेत्री आहे. मात्र आता त्यांच्या जावयाची छोट्या पडद्यावर एन्ट्री झाली आहे.
निळू फुले यांचा जावई ओंकार थत्ते (Omkar Thatte) कलर्स मराठीच्या ‘इंद्रायणी’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहेत. याच मालिकेत निळू फुले यांची मुलगी गार्गी फुले सुद्धा एका छोट्याशा भूमिकेत झळकत आहेत. त्यांचा जावई आणि मुलगी पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.
थ्री इडियट्स फेम ओमी वैद्य याच्या ‘आईच्या गावात मराठीत बोल’ या चित्रपटात ओंकार थत्ते यांनी एक महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. निळू फुले यांचा जावई म्हणून त्यांची अभिनय क्षेत्रात एन्ट्री झाली होती. चित्रपट करण्याअगोदर त्यांनी एक जाहिरात केली होती. त्यामुळे ओंकार थत्ते आता तिन्ही माध्यमातून झळकलेले पाहायला मिळत आहेत.