आर्ची उर्फ रिंकू राजगुरूचं ठरलं का लग्न?; साडीतील फोटोंमुळे रंगलीय चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 15:51 IST2021-12-11T15:51:25+5:302021-12-11T15:51:52+5:30
रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) सोशल मीडियावरील लेटेस्ट फोटोमुळे चर्चेत आली आहे.

आर्ची उर्फ रिंकू राजगुरूचं ठरलं का लग्न?; साडीतील फोटोंमुळे रंगलीय चर्चा
सैराट (Sairat Movie) चित्रपटातून रसिकांच्या मनात अल्पावधीत अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) हिने घर केले. त्यानंतर ती आणखी मराठी चित्रपटात आणि हिंदी वेबसीरिजमध्ये पाहायला मिळाली. तसेच रिंकू राजगुरू ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. दरम्यान ती पुन्हा एकदा फोटोंमुळे चर्चेत आली आहे. यावेळी तिने साडीतील फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहते तिला तुझे लग्न ठरले का असे विचारताना दिसत आहेत.
नुकतेच रिंकू राजगुरूने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर गुलाबी रंगाच्या काठपदराच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत. तिने फोटो शेअर करत लिहिले की, वाईब्स. नवीन काहीतरी लवकरच येणार आहे. या फोटोत रिंकूने गुलाबी रंगाच्या साडीवर वेणी घातली आहे आणि गजरा माळला आहे. तसेच तिने बिंदीदेखील घातली आहे. या फोटोला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. या फोटोवर काही युजरने म्हटले की, अतिसुंदर, अप्रतिम, मराठमोळा लूक. तर एका युजरने विचारले की ठरलं का?, तर दुसऱ्या युजरने लिहिले की, लग्न? आणखी एका युजरने म्हटले की लय भारी.
रिंकू राजगुरूने वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर शेवटची ती अनकही कहानियां या वेबसीरिजमध्ये झळकली आहे. तसेच २०० हल्ला होमध्येदेखील ती दिसली. लवकरच ती नागराज मंजुळे दिग्दर्शित हिंदी चित्रपट झुंडमध्ये काम करताना दिसणार आहे. तसेच तिने छुमंतर या मराठी सिनेमातही काम केले आहे.