"दुबई एअरपोर्टच्या आत अजाण सुरु झाली अन्..."; 'धर्मवीर' फेम मंगेश देसाईंची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 09:33 IST2025-09-22T09:32:05+5:302025-09-22T09:33:57+5:30
दुबई एअरपोर्टवर आलेला अनुभव मंगेश देसाईंनी पोस्टच्या माध्यमातून शेअर केला. काय म्हणाले मंगेश?

"दुबई एअरपोर्टच्या आत अजाण सुरु झाली अन्..."; 'धर्मवीर' फेम मंगेश देसाईंची पोस्ट चर्चेत
मराठी मनोरंजन विश्वात लोकप्रिय अभिनेते म्हणजे मंगेश देसाई. 'धर्मवीर' आणि 'धर्मवीर २'च्या माध्यमातून मंगेश देसाईंनी मराठी सिनेसृष्टीत सुपरहिट सिनेमांची निर्मिती केली. मंगेश देसाईंनी या दोन्ही सिनेमात पत्रकाराची भूमिका साकारली. अशातच मंगेश देसाईंनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट शेअर केली आहे. मंगेश देसाईंनी लिहिलेल्या या पोस्टचं कौतुक होतंय. काय म्हणतात मंगेश देसाई?
मंगेश देसाईंची पोस्ट चर्चेत
मंगेश देसाई लिहितात, ''मी परवा दुबई एयरपोर्ट वरून मुंबईला येत होतो. चेकइन करत होतो आणि अचानक सुरेल आवाजात एयरपोर्टच्या आत “अजाण “सुरू झाली. आणि जाणवलं प्रत्येक धर्म आपलं अस्तित्व जपायचा प्रयत्न करत असतो.वेगवेगळ्या माध्यमातून. मग आपल्या इथल्या एकाही एयरपोर्ट वर का नाही ऐकू येत एखादी प्रार्थना? ते एक माध्यम आहे आपल अस्तित्व टिकवण्याचं. देवाने आपल्याला ज्यात्या धर्मात स्थान दिलेल असतं,ती आपली निवड नसते. पण त्याचे आभार आपण त्याची आठवण करूनच मानू शकतो आणि ते आपले कर्तव्य आहे. टिप-कृपया याला जाती धर्म आणि राजकारणाचा रंग देऊ नये. जसे माझे कुटुंब आहे तसेच तुमचेही आहे.''
अशाप्रकारे मंगेश देसाईंनी लिहिलेल्या पोस्टची खूप चर्चा आहे. मंगेश देसाईंनी पोस्टमधून मांडलेला संदेश अनेकांना आवडला आहे. मंगेश देसाईंच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, ते सध्या 'देऊळ बंद २' या सिनेमाचं शूटिंग करत आहेत. प्रवीण तरडे या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. सर्वांना या सिनेमाची उत्सुकता आहे. सिनेमात मंगेश यांची प्रमुख भूमिका असून त्यांच्यासोबत आणखी कोण असणार, असा सर्वांना प्रश्न पडला आहे.