रुपेरी पडद्यावर झळकण्यास 'देवमाणूस' सज्ज; 'या' सिनेमात साकारणार मुख्य भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 14:23 IST2023-05-18T14:22:41+5:302023-05-18T14:23:52+5:30
Kiran gaikwad: 'काही विषय झालेले असतात काही होणार असतात...',असं म्हणत किरणने या सिनेमाचं डिजिटल पोस्टर शेअर केलं.

रुपेरी पडद्यावर झळकण्यास 'देवमाणूस' सज्ज; 'या' सिनेमात साकारणार मुख्य भूमिका
'देवमाणूस', 'लागीरं झालं जी' या मालिकेच्या माध्यमातून नावारुपाला आलेला अभिनेता म्हणजे किरण गायकवाड (kiran gaikwad). देवमाणूस या मालिकेत खलनायिकी भूमिका साकारुन किरण खऱ्या अर्थाने लोकप्रिय झाला. इतकंच नाही तर आजही अनेक जण त्याला देवमाणूस याच नावाने ओळखतो. विशेष म्हणजे किरण मालिका विश्वात आपलं स्थान भक्कम केल्यानंतर त्याने त्याचा मोर्चा सिनेमांकडे वळवला आहे.
काही दिवसांपूर्वीच किरणने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या अपकमिंग प्रोजेक्टची माहिती चाहत्यांना दिली. त्यानुसार, किरण लवकरच 'चौक' (chowk) या आगामी सिनेमात झळकणार आहे. 'काही विषय झालेले असतात काही होणार असतात...',असं म्हणत किरणने 'चौक' चित्रपटाचं डिजिटल पोस्टर शेअर केलं. या सिनेमात किरण पहिल्यांदाच एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामुळे त्याला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. चौक या सिनेमात किरण, सनी ही भूमिका साकारणार आहे.
'देवमाणूस'च्या तालावर नाचले प्रवीण तरडे; खतरनाक डान्स व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, अनुराधा प्रोडक्शनचा हा सिनेमा २ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री संस्कृती बालगुडे स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती दिलीप लालासाहेब पाटील यांनी केली आहे. तर,कथा, पटकथा , संवाद आणि दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांचं आहे.