'दशावतार' सिनेमा थिएटरमध्ये फक्त ९९ रुपयात बघायचाय? निर्मात्यांची खास ऑफर, लगेच जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 10:59 IST2025-09-23T10:51:45+5:302025-09-23T10:59:55+5:30

‘दशावतार’ सिनेमा आज स्वस्तात बघण्याची खास संधी आहे. विशेष ऑफरबद्दल लगेच जाणून घ्या

dashavtar marathi movie watch only 99 rs in theatres mumbai dilip prabhavalkar | 'दशावतार' सिनेमा थिएटरमध्ये फक्त ९९ रुपयात बघायचाय? निर्मात्यांची खास ऑफर, लगेच जाणून घ्या

'दशावतार' सिनेमा थिएटरमध्ये फक्त ९९ रुपयात बघायचाय? निर्मात्यांची खास ऑफर, लगेच जाणून घ्या

मराठी चित्रपटसृष्टीतील भव्य निर्मिती असलेल्या ‘दशावतार’ हा चित्रपट सध्या हाऊसफुल्ल गर्दीत सुरु आहे. बॉक्स ऑफिसवर सुद्धा ‘दशावतार’ चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे. ‘दशावतार’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रेक्षकांना पुन्हा एकदा सुखद धक्का दिला आहे. ‘दशावतार’ चित्रपट केवळ ९९ रुपयांमध्ये पाहण्याची खास संधी प्रेक्षकांना मिळाली आहे. निर्मात्यांनी चित्रपटाला आणखी मोठा प्रतिसाद मिळावा यासाठी  ‘दशावतार’चे तिकिट दर कमी केले आहेत. जाणून घ्या या ऑफरबद्दल

९९ रुपयांत 'दशावतार' पाहण्याची संधी

‘दशावतार’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. मात्र, प्रेक्षकांनी दिलेला भरभरून प्रतिसाद पाहून निर्मात्यांनी आज (मंगळवारी) चित्रपटाचं तिकिट कमी करण्याचा निर्णय घेतलाय. ही विशेष 'मंगळवार ऑफर' देशभरातील निवडक सिनेमागृहांमध्ये लागू आहे. या ऑफरमुळे, ज्या प्रेक्षकांना हा चित्रपट अजून पाहता आला नाही, त्यांना मोठ्या पडद्यावर ही भव्य कलाकृती अनुभवता येईल. ‘दशावतार’ हा चित्रपट केवळ मनोरंजनच नाही, तर या चित्रपटातून प्रेक्षकांना दिग्गज कलाकारांचा अभिनय मोठ्या पडद्यावर बघण्याची संधी मिळतेय.


चित्रपटाची भव्यता आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद

‘दशावतार’ या चित्रपटाने आपल्या उत्कृष्ट कथेमुळे आणि उत्कृष्ट व्हीएफएक्समुळे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. कोकणात घडणारं कथानक आणि दिलीप प्रभावळकरांचा उत्कृष्ट अभिनय या जोरावर ‘दशावतार’ चित्रपट पाहणं ही प्रेक्षकांसाठी एक पर्वणी आहे. अशातच आज असलेल्या ९९ रुपयांच्या या ऑफरमुळे चित्रपटाला मोठ्या प्रमाणात प्रेक्षकसंख्या मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘दशावतार’च्या बॉक्स ऑफिस कमाईला याचा फायदा नक्कीच होईल, अशी अपेक्षा आहे. ‘दशावतार’ चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांच्याबरोबर सिद्धार्थ मेनन, महेश मांजरेकर, सुनील तावडे, भरत जाधव, प्रियदर्शनी इंदलकर या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Web Title: dashavtar marathi movie watch only 99 rs in theatres mumbai dilip prabhavalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.