होय महाराजा! 'दशावतार' सिनेमाची कमाई सुसाट, ७ दिवसात कमावले 'इतके' कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 14:30 IST2025-09-19T14:26:56+5:302025-09-19T14:30:00+5:30

'दशावतार'च्या कमाईत चांगलीच वाढ झाली असून या सिनेमाने सात दिवसात रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. जाणून घ्या

dashavtar marathi movie box office collection day 7 dilip prabhavalkar | होय महाराजा! 'दशावतार' सिनेमाची कमाई सुसाट, ७ दिवसात कमावले 'इतके' कोटी

होय महाराजा! 'दशावतार' सिनेमाची कमाई सुसाट, ७ दिवसात कमावले 'इतके' कोटी

 'दशावतार' सिनेमा गेल्या आठवड्यात रिलीज झाला. १२ सप्टेंबरला सिनेमा जगभरातील थिएटरमध्ये रिलीज झाला. या सिनेमाला पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. माऊथ पब्लिसिटिच्या जोरावर  'दशावतार' सिनेमा हाऊसफुल्ल गर्दीत सुरु झाला. सिनेमा रिलीज होऊन सात दिवस झाले आहेत. सात दिवसात सिनेमाने मोठी कमाई केलीय. त्यामुळे मराठी सिनेमाची ताकद संपूर्ण जगाला कळाली आहे.

 'दशावतार' सिनेमाची बॉक्स ऑफिस कमाई

 'दशावतार' सिनेमाच्या टीमने सोशल मीडियावर सिनेमाच्या सात दिवसांचा कमाईचा आकडा शेअर केला आहे. 'दशावतार' सिनेमाने सात दिवसात तब्बल १०.८० कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे 'दशावतार'ची टीम नक्कीच आनंदात असेल यात शंका नाही. काहीच दिवसांपूर्वी अमेरिका, न्यूयॉर्कमधील काही थिएटरमध्ये  'दशावतार' सिनेमा रिलीज झाला आहे. जगभरात 'दशावतार' जी कमाई करेल, त्यानुसार पुढील काही दिवसात या सिनेमाची कमाई आणखी वाढेल यात शंका नाही. दरम्यान 'दशावतार' सिनेमाचा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी पाहिला आहे.




उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब सहपरिवार ‘दशावतार' सिनेमाचा अनुभव घेतला. हा सिनेमा पाहून उद्धव ठाकरे म्हणतात, ‘दशावतार' ‘या चित्रपटाची कथा जरी कोकणातील असली तरी व्यथा संपूर्ण महाराष्ट्राची आहे. आज आपण कुठे आहोत नि कुठल्या दिशेने चाललो आहोत, हे वेळीच ओळखलं नाही तर आपण एका कडेलोटाच्या टोकावर आहोत, हे दाखवून देणारा हा चित्रपट आहे. सगळ्यांचीच कामं उत्तम आहेत. पण दिलीप प्रभावळकर यांनी जे करून ठेवलंय ते अद्भुत आहे. सुबोध खानोलकर या तरूण दिग्दर्शकाने एक परिपूर्ण चित्रपट मराठीला दिलाय.'' 

Web Title: dashavtar marathi movie box office collection day 7 dilip prabhavalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.