Dashavatar: कोणालाच जमलं नाही ते 'दशावतार'ने करून दाखवलं! शनिवारी दुप्पट कमाई, सिनेमाच्या निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 15:25 IST2025-09-21T15:24:21+5:302025-09-21T15:25:12+5:30

प्रेक्षकांच्या काळजाचा घाव घेण्यास 'दशावतार' यशस्वी ठरला आहे. 'दशावतार'मुळे पुन्हा मराठी सिनेमांना अच्छे दिन आल्याचे दिसत आहे. 

dashavatar box office collection marathi movie earned double on 2nd saturday | Dashavatar: कोणालाच जमलं नाही ते 'दशावतार'ने करून दाखवलं! शनिवारी दुप्पट कमाई, सिनेमाच्या निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय

Dashavatar: कोणालाच जमलं नाही ते 'दशावतार'ने करून दाखवलं! शनिवारी दुप्पट कमाई, सिनेमाच्या निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय

Dashavtar : 'दशावतार' हा मराठी सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. कोकणातील परंपरा आणि दिलीप प्रभावळकर या दिग्गज नटाच्या अभिनयाने सजलेल्या 'दशावतार' सिनेमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. प्रेक्षकांच्या काळजाचा घाव घेण्यास 'दशावतार' यशस्वी ठरला आहे. 'दशावतार'मुळे पुन्हा मराठी सिनेमांना अच्छे दिन आल्याचे दिसत आहे. 

१२ सप्टेंबरला प्रदर्शित झालेला 'दशावतार' बॉक्स ऑफिसवर चांगलीच बॅटिंग करत आहे. प्रेक्षकांनी मराठी सिनेमांकडे फिरवलेली पाठ ते पुन्हा त्यांना सिनेमागृहांपर्यंत खेचून आणण्यास 'दशावतार'ला यश आलं आहे. म्हणूनच पहिल्या दिवसापासूनच 'दशावतार'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पहिल्या वीकेंडला बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आता दुसऱ्या शनिवारीही 'दशावतार'ने छप्परफाड कमाई केली आहे. 

'दशावतार' सिनेमाने नवव्या दिवशी तब्बल २.६५ कोटींचा गल्ला जमवला आहे. आत्तापर्यंत 'दशावतार'ने १२.८५ कोटींची कमाई केली आहे. सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहून 'दशावतार'च्या निर्मात्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. 'दशावतार'चे सिनेमागृहातील शो वाढवण्यात आले आहेत. आता सिनेमा रविवारी हा सिनेमा किती कमाई करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

दरम्यान, 'दशावतार' सिनेमात  'दशावतार' सिनेमात दिलीप प्रभावळकर मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात त्यांनी दशावतारी कलाकार बाबुलीची भूमिका साकारली आहे. सिद्धार्थ मेनन, भरत जाधव, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डे, महेश मांजरेकर, सुनील तावडे, आरती वाबगावकर अशी 'दशावतार'ची स्टारकास्ट आहे. सुबोध खानोलकर यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा १२ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. 

Web Title: dashavatar box office collection marathi movie earned double on 2nd saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.