सुकन्या मोनेंच्या फॅन आहेत मिसेस मुख्यमंत्री; एकनाथ शिंदेंबरोबरचा फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली, "आपल्या सौ..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 01:08 PM2023-09-28T13:08:23+5:302023-09-28T13:10:12+5:30

सुकन्या मोनेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं. याचे काही फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

cm eknath shinde wife lata shinde is fan of sukanya mone marathi actress shared special post | सुकन्या मोनेंच्या फॅन आहेत मिसेस मुख्यमंत्री; एकनाथ शिंदेंबरोबरचा फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली, "आपल्या सौ..."

सुकन्या मोनेंच्या फॅन आहेत मिसेस मुख्यमंत्री; एकनाथ शिंदेंबरोबरचा फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली, "आपल्या सौ..."

googlenewsNext

सुकन्या मोने या मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. गेली कित्येक वर्ष त्या प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहेत. 'वादळवाट' आणि 'आभाळमाया' या गाजलेल्या मालिकांमध्ये काम करुन त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. 'बाईपण भारी देवा' या काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या सुपरहिट मराठी चित्रपटात सुकन्या मोने मुख्य भूमिकेत होत्या. त्यांचे अनेक चाहते आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदेही सुकन्या मोनेंच्या फॅन आहेत. 

सुकन्या मोने सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं. याचे काही फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोला दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. सुकन्या मोनेंनी या पोस्टमध्ये मुख्यमंत्रयांचे आभार मानत त्यांच्या पत्नी फॅन असल्याचं म्हटलं आहे. 

"मा.मुख्यमंत्री श्री.एकनाथराव शिंदे यावर्षी आपल्या श्री गणपती दर्शनाला मला आवर्जून निमंत्रित केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! आपण आणि आपल्या कुटुंबाने आम्हा सगळ्या कलाकार मंडळींकडे जातीने लक्ष दिलेत त्याबद्दल आभार. आपल्या सौ.नी त्या माझ्या पूर्वीपासून फॅन आहेत हे सांगून मला सुखावले. पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार! गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!", असं सुकन्या मोनेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

सुकन्या मोने यांच्याबरोबर अनेक मराठी कलाकारांनी वर्षा बंगल्यावर जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मराठी कलाकारांना आमंत्रित करण्यात आलं होतं. अमृता खानविलकर, श्रेया बुगडे, मंगेश देसाई, हेमांगी कवी, विशाल निकम, अपूर्वा नेमळेकर हे कलाकार वर्षा बंगल्यावर बाप्पाच्या दर्शनासाठी गेले होते. 

Web Title: cm eknath shinde wife lata shinde is fan of sukanya mone marathi actress shared special post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.