चिन्मय मांडलेकरचा तरुणाईसोबत डान्स, मरीन ड्राईव्हवर 'सुभेदार'च्या टीमचा कल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 16:20 IST2023-08-13T16:18:20+5:302023-08-13T16:20:23+5:30
'सुभेदार'च्या स्टारकास्टने मरीन ड्राईव्हवर तरुणाईसोबत डान्स केला.

चिन्मय मांडलेकरचा तरुणाईसोबत डान्स, मरीन ड्राईव्हवर 'सुभेदार'च्या टीमचा कल्ला
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांच्या (Digpal Lanjekar) 'अष्टक शिवाजी' सिरीजमधील पाचवा सिनेमा 'सुभेदार' (Subhedar) लवकरच प्रदर्शित होतोय. सुभेदार तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा या सिनेमातून उलगडणार आहे. तर चिन्मय मांडलेकरने (Chinmay Mandlekar) छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. सध्या सिनेमाचं जोरदार प्रमोशन सुरु आहे. 'सुभेदार'च्या स्टारकास्टने मरीन ड्राईव्हवर तरुणाईसोबत डान्स केला. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.
मरीन ड्राईव्हवर दर रविवारी 'संडे स्ट्रीट'चे आयोजन केले जाते. सकाळी ६ ते १० पर्यंत अनेक मंडळी इथे येऊन रविवार एन्जॉय करतात. डान्स, साहसी खेळ, स्केटिंग, गाणी असा एकंदर माहोल याठिकाणी असतो. 'सुभेदार'ची टीमही आज मरीन ड्राईव्हवर दाखल झाली. यावेळी चिन्मय मांडलेकर, विराजस कुलकर्णी यांनी तरुणाईसोबत ठेका धरला.सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
मराठी प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सिनेमाचा ट्रेलर आणि आले मराठे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं आहे. ट्रेलरमधील अनेक प्रसंग अंगावर शहारे आणणारे आहेत. अभिनेता अजय पुरकर सिनेमात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत आहे. 'धुमाकूळ घालणार सुभेदार' अशी कमेंट एकाने केली आहे. स्मिता शेवाळे, विराजस कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे, शिवानी रांगोळे, समीर धर्माधिकारी यांच्याही सिनेमात भूमिका आहेत. १८ ऑगस्ट रोजी सिनेमा प्रदर्शित होत आहे.