"सुंदर दिसणारीचं बायको हवीये" अभिनेता संतोष जुवेकरनं सांगितल्या अपेक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 16:06 IST2025-02-12T15:51:32+5:302025-02-12T16:06:21+5:30
संतोषने त्याला बायको म्हणून कशी मुलगी आहे, हे सांगितलं.

"सुंदर दिसणारीचं बायको हवीये" अभिनेता संतोष जुवेकरनं सांगितल्या अपेक्षा
अभिनेते संतोष जुवेकर (Santosh Juvekar) हा एक लोकप्रिय अभिनेता आहे. संतोषनं अभिनयाच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यानं मराठीसह हिंदीतही काम केलं आहे. संतोषचा चाहतावर्गही मोठा आहे. सध्या तो अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मंदानाच्या 'छावा' सिनेमामुळे चर्चेत असतो. या सिनेमात तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'छावा' सिनेमा प्रमोशनासाठी तो वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देताना दिसतोय. संतोष अनेक तरुणींची क्रश आहे. अद्याप अविवाहित असलेल्या संतोषसोबत विवाह करण्यासाठी अनेक तरुणी उत्साहित आहेत. अशातच एका मुलाखतीत संतोषने त्याला बायको म्हणून कशी मुलगी आहे, हे सांगितलं.
४० वर्ष वय असलेला संतोष जुवेकर हा सध्या सिंगल आणि चिल मोडवर आहे. अलीकडेच त्यानं लोकशाहीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याला कधीपर्यंत सिंगल राहणार आहेस. जोडीदार कशी हवी आहे ? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तो म्हणाला, लोक म्हणतात ना की आमचा दिसण्यावर विश्वास नाही, मनाने सुंदर पाहिजे. माझं असं काही नाही. मला चांगली सुंदर दिसणारीचं बायको हवी आहे. माझ्या काही अशा खास अपेक्षा नाहीत. उद्या जर मला एखादी मुलगी आवडली आणि मला कळालं की तिला काहीच येत नाही. मग मी करेल तडजोड. जर मला खरचं प्रेम झालं, ती घंटा वाजली, तर मी सगळं अॅडजस्ट करेल".
संतोष जुवेकरने 'छावा' सिनेमामध्ये रायाजी मालगे यांची भूमिका साकारली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या ८ मुख्य योद्ध्यांमध्ये रायाजी यांचादेखील समावेश होता. या भूमिकेसाठी संतोषने खूप मेहनत घेतली आहे. त्याने विकीसोबत २ महिने प्रशिक्षण घेतलं. घोडेस्वारी, तलवारबाजी,भालाफेकही तो शिकला. संतोषला या चित्रपटात पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. संतोषनं 'छावा'च्या आधीही संतोषने काही हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे. तसेच 'झेंडा', 'मोरया', 'रानटी' असे मराठीत दमदार सिनेमेही दिले आहेत.